झहीर खानची गणना भारताच्या महान वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. जेव्हा त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा तो भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. आजपर्यंत त्याला कोणीही मागे टाकू शकलं नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की टीम इंडियासाठी डेब्यू करण्यापूर्वी झहीर खाननं दुसऱ्या देशासाठी एक मॅच खेळली होती?
हे आश्चर्यकारक असलं तरी खरं आहे. हा खुलासा न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिस यानं केला. खुद्द झहीर खानला हे आठवत नव्हतं. मात्र जेव्हा स्टायरिसनं त्याला हे सांगितलं, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला सर्व काही आठवलं.
जिओ सिनेमाच्या शोमध्ये बोलताना स्टायरिसनं झहीरला तो ऑस्ट्रेलियासाठी पहिला सामना खेळल्याची आठवण करून दिली. स्टायरिसनं झहीरला विचारलं, “तुला आठवतं का, तू पहिल्यांदा कोणत्या देशासाठी क्रिकेट सामना खेळला होतास? मी तुझ्याविरुद्ध खेळलो होतो.” तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, झहीर ऑस्ट्रेलियाकडून खेळला आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
याबाबत बोलताना झहीर खान म्हणाला की, त्यावेळी अकादमी ॲडलेडमध्ये असायची. मायकेल क्लार्क त्याच्यासोबत अकादमीत होता. तो आणि क्लार्क एकत्र खेळले आहेत. हा सराव सामना होता, ज्यात झहीर ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
View this post on Instagram
झहीर खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 2000 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं भारतासाठी 92 कसोटी सामन्यांमध्ये 311 बळी घेतले आहेत. 87/7 ही त्याची एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय त्यानं भारतासाठी 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये 282 बळी घेतले आहेत. 5/42 ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्यानं 2014 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरच्या खेळाडूला ‘ही’ चूक पडली महागात, BCCI ने ठोठावला दंड; जाणून घ्या
क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल, जय शहा यांची सुचना ! टॉसची भानगड नको, दोनपैकी ‘या’ संघाने घ्यावा निर्णय
बुमराहच्या आऊट स्विंग होणाऱ्या चेंडूनं अचानक वाट बदलली! सुनील नारायण चारी मुंड्या चित! पाहा VIDEO