---Advertisement---

संपूर्ण यादी: मेरी कोम, झहीर खान, पीव्ही सिंधूसह या ८ खेळाडूंचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान

---Advertisement---

यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध खेळांतील 8 खेळाडूंना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये क्रिकेटपटू झहीर खान, स्टार महिला बॉक्सर मेरी कोम, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांचा समावेश आहे.

मेरी कोमला भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म विभूषण जाहीर झाला आहे. तीने मागीलवर्षी वर्ल्डचॅम्पियनशिपनध्ये कांस्य पदक जिंकले होते. हे तिचे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 8 वे पदक होते. यात तिच्या 6 सुवर्णपदकाचा आणि 1 रौप्यपदकाचाही समावेश आहे. तसेच तिने 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

याबरोबरच सिंधूला भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म भूषण जाहीर झाला आहे. तिने 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. तसेच वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू देखील आहे.

याव्यतिरिक्त भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 610 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचा देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मान होणार आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

याशिवाय महिला फुटबॉलपटू ओइनाम बेमबेम देवी, माजी हॉकीपटू एमपी गणेश, नेमबाज जीतू राय, तिरंदाज तरुणदीप राय यांनाही भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

या खेळाडूंची झाली 2020 पद्म पुरस्कारांसाठी निवड – 

पद्मविभूषण –

मेरी कोम – बॉक्सिंग

पद्मभूषण –

पीव्ही सिंधू – बॅडमिंटन

पद्मश्री – 

जहीर खान – क्रिकेट

ओइनाम बेमबेम देवी – फुटबॉल

एमपी गणेश – हॉकी

जीतू राय – नेमबाजी

तरुणदीप राय – तिरंदाज

राणी रामपाल – हॉकी

https://twitter.com/Maha_Sports/status/1221141018747142144

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---