पाकिस्तान आणि इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून चार खेळाडूंनी शतकी खेळी केली. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूनेही पदार्पणातच द्विशतकी खेळी केली, मात्र यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.
झाहिद महमूद (Zahid Mahmood) या 34 वर्षीय खेळाडूने पाकिस्तानकडून कसोटीमध्ये पदार्पण केले. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात 33 षटके टाकताना 235 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने बेन डकेट, जो रुट, ऑली रॉबिनसन आणि जेम्स ऍडरसन यांना बाद केले. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट 7.10 राहिला.
या अत्यंत वाईट कामगिरीसह महमूदने त्याच्या नावावर लाजिरवाना विक्रम नोंदवला आहे. कसोटीमध्ये पदार्पण करताना एका डावात सर्वाधिक धावा खर्च करण्याचा विक्रम आता या पाकिस्तानी खेळाडूच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या सूरज रणदिव याच्या नावावर होता. त्याने 2010मध्ये भारताविरुद्ध 73 षटके टाकताना 222 धावा दिल्या होत्या.
झाहिदने इंग्लंडविरुद्ध एका षटकात 27 धावा दिल्या होत्या. यामुळे तो पाकिस्तानकडून कसोटीच्या एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज देखील ठरला.
या सामन्यात इंग्लंडकडून झॅक क्राऊले (122), बेन डकेट (107), ऑली पोप (108) आणि हॅरी ब्रुक (153) धावा केल्या आहेत. यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावसंख्या उभारली. या सामन्यात इंग्लंडने देखील अनेक विक्रम केले. त्यांचे सलामीवीर क्राऊले-डकेट यांनी 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी, हॅरी ब्रूक याने एका षटकार मारले 6 चौकार, कसोटी इतिहासात पहिल्या दिवशी 500 धावांचा टप्पा आणि कसोटीच्या पहिल्या दिवशी चार खेळाडूंचे शतक यांचा त्यामध्ये समावेश आहे. Zahid Mahmood conceded Most runs in an innings on Test debut, PAKvENG
कसोटी पदार्पणाच्या एका डावात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज-
227* – झाहिद महमूद (पाकिस्तान) वि. इंग्लंड v ENG, 2022
222 – सूरज रणदिव वि. भारत, 2010
215 – जेसन क्रेझा वि. भारत, 2008
204 – ओमारी बँक्स वि. ऑस्ट्रेलिया, 2003
195 – नीलेश कुलकर्णी वि. श्रीलंका, 1997
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संकटमोचक ऋतुराज गायकवाड! विजय हजारे ट्रॉफीमध्ये मारला शतकांचा ‘चौकार’
‘विश्वविक्रमी’ रावळपिंडी टेस्ट! पाकिस्तानवर बझबॉल भारी, इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवला पहिला दिवस