काल (२५ ऑगस्ट) साउथम्पटन येथे इंग्लंज विरुद्ध पाकिस्तान संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना पार पडला. २१ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातच इंग्लंडचा फलंदाज झॅक क्राऊलेने दमदार द्विशतकी खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत त्याने ३९३ चेंडूत २६७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३४ चौकारांचा आणि एका षटकाराचा समावेश होता.
झॅक क्राऊलीच्या या अफलातून खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अशात एकीकडे क्राऊलेच्या ऐतिहासिक खेळीची प्रशंसा होत होती. तर, दूसरीकडे सोशल मीडियावर त्याच्याविषयी एक चुकिची अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. त्यामुळे त्याच्या विक्रमापेक्षा जास्त त्या गैरसमजूतीच्या जास्त चर्चा रंगल्या होत्या. Zak Crawley And John Crawley Wrong News Viral On Social Media
झाले असे की, क्राऊलेने २२ ऑगस्ट रोजी तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या दिवशी त्याची कसोटीतील ऐतिहासिक द्विशतकी खेळी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर वृत्त पसरले होते की, ‘इंग्लंडच्या या फलंदाजाने त्याचे वडील जॉन क्राऊलेप्रमाणे २२ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले आहे.’ पण, या वृत्तामागचे सत्य काही वेगळेच आहे.
जॉन क्राऊले हे इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू आहेत. पण झॅक क्राऊले हा त्यांचा मुलगा नाही. क्राऊलेच्या वडिलांचे नाव टॅरी आहे. महत्त्वाचे म्हणजे, ते क्रिकेटपटू नव्हते. टॅरी क्राऊले हे दक्षिण लंडनमध्ये गालीचे लावण्याचे काम करत होते. त्यांना गोल्फ खेळायला खूप आवडत असे. त्यामुळे त्यांचा डोळ्यांचा आणि हाताचा ताळमेळ कमालीचा होता.
आपल्या वडिलांप्रमाणे क्राऊलेलाही गोल्फर बनायचे होते. पण, हळूहळू त्याची क्रिकेटमधील रुची वाढत गेली. सुदैवाने नोव्हेंबर २०१९मध्ये त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून इंग्लंड संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत कसोटीत ८ सामने खेळत ५८१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भल्या भल्यांना न जमणारा कीर्तिमान विराट केला स्थापित, बनला पहिलाच आशियाई सेलिब्रिटी
आयपीएलमधील ‘या’ संघाला सोडून जायचे होते युवराज सिंगला, नक्की काय होतं कारण
फक्त ०.०१७ टक्क्यांनी हुकला जेम्स अँडरसनचा जगातील सर्वात मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख –
दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश