इंग्लंड क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज झॅक क्राऊली पुढील आयपीएल लिलावात आपले नाव नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. याशिवाय बिग बॅश लीगमध्येही पुनरागमन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या क्राऊलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये परतण्याचे मन बनवले आहे.
क्राऊलीला 2019 मध्ये कसोटी संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जास्त खेळू शकला नाही. दोन वर्षांपूर्वी, क्राऊलीला इंग्लंड वनडे संघात संधी मिळाली होती. ज्यामध्ये तो द्वितीय श्रेणी संघाचा भाग होता. इंग्लंड डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून क्राऊलीने संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इंग्लंडला आपली पुढील कसोटी मालिका भारतात खेळायची आहे. याबाबत बोलताना क्राऊली म्हणाला, ‘भारत दौऱ्यापूर्वी माझे लक्ष वेगवेगळ्या लीगवर आहे. मी गेल्या वर्षी बीबीएलला गेलो होतो आणि मला ती स्पर्धा खूप आवडली. जर त्यांनी मला पुन्हा संधी दिली तर मी नक्कीच खेळण्याचा विचार करेन.” क्राऊलीने गेल्या वर्षी होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना आठ सामने खेळले होते.
याचबरोबर आयपीएलच्या लिलावावरही क्राऊलीच्या नजरा लागल्या आहेत. तो म्हणाला, ‘ही जगातील सर्वात मोठी फ्रँचायझी क्रिकेट लीग आहे. हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्वोत्कृष्ट खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात. आयपीएलमध्ये कोणत्याही फ्रँचायझीने माझ्याबद्दल स्वारस्य दाखवले तर आनंदाची गोष्ट असेल.”
क्राऊली यावेळच्या ऍशेस मालिकेत इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 80 पेक्षा जास्त दिसला.
(Zak Crawley Wants Play In IPL Next Year)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विश्वचषकाआधीच केएल राहुल दिसणार मैदानात
“मी नक्कीच तुम्हाला वर्ल्डकपमध्ये दिसणार”, कार्तिकच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया






