जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची महत्त्वपूर्ण कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यावरही आपली पकड मजबूत केली आहे. इंग्लंडचा पहिला डाव ३०३ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाखेर ३ बाद २२९ अशी मजल मारली. त्या सामन्यात इंग्लंडच्या झॅक क्राऊली यांनी विजेच्या वेगाने आलेला चेंडू झेलत जम बसलेल्या डेवॉन कॉनवेला तंबूचा रस्ता दाखवला.
न्यूझीलंडची अप्रतिम गोलंदाजी
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडचे उर्वरित तीन फलंदाज केवळ १० षटकात बाद झाले. इंग्लंडकडून सलामीवीर रॉरी बर्न्स व डॅन लॉरेन्स न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना चांगला केला. दोघांनी प्रत्येकी ८१ धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने सर्वाधिक चार बळी मिळविले. मॅट हेन्री, एजाज पटेल व नील वॅग्नर यांनी अनुक्रमे ३,२ व १ बळी आपल्या नावे केला.
न्यूझीलंडची शानदार सुरुवात
इंग्लंडचा पहिला डाव ३०३ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. कर्णधार टॉम लॅथम ६ धावांवर माघारी परतल्यानंतर दोन्ही युवा फलंदाज डेवॉन कॉनवे व विल यंग यांनी डाव सावरला. कॉनवेने आपला अफलातून फॉर्म कायम राखत ८० धावांची खेळी केली.
कॉनवेची ही खेळी झॅक क्राऊलीच्या एका जबरदस्त झेलाने संपुष्टात आली. कॉनवे-यंग जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १२२ धावा जोडल्या असताना स्टुअर्ट ब्रॉडचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावला. काहीसा हवेत मारलेला चेंडू चौकाराच्या दिशेने जात असताना, झॅक क्राऊलीने मध्येच येत सूर मारत झेल पकडला.
The wicket we needed! 🙌
Scorecard & Clips: https://t.co/BbquQqdQYF#ENGvNZ pic.twitter.com/6aNV3lGcAg
— England Cricket (@englandcricket) June 11, 2021
कॉनवे बाद झाल्यानंतरही केन विलियम्सनच्या जागी खेळणाऱ्या विल यंगने डावाच्या जबाबदारी घेत ८१ धावांची खेळी केली. फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या डॅन लॉरेन्सने त्याला दिवसातील अखेरच्या षटकात बाद केले. दिवसाखेर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद २२९ होती. रॉस टेलर ४६ नाबाद खेळत होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, पण का? इमाम-उल-हक यांनी सांगितले कारण
जबरदस्त हिम्मत! ज्या कारणामुळे संघाबाहेर झाला, चुरशीच्या टी२० विश्वचषकात त्यातच आजमावणार हात