---Advertisement---

जबरदस्त हिम्मत! ज्या कारणामुळे संघाबाहेर झाला, चुरशीच्या टी२० विश्वचषकात त्यातच आजमावणार हात

On: शनिवार, जून 12, 2021 3:12 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघातून आपले स्थान गमावल्यानंतर आता भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्या श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० मालिकेतून पुनरागमन करणार आहे. हार्दीक पांड्या हा भारतीय संघाच्या मधल्या फळीतील खूप महत्वपूर्ण फलंदाज आहे. हार्दीकला आपल्या पाठीच्या दुखण्यामुळे कमी गोलंदाजी करण्यास सांगितली आहे. तो अजूनही गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे फिट नाही.

तरीही या अष्टपैलूने आगामी टी-20 विश्वचषकासाठी एक निवेदन दिले आहे. या विश्‍वचषकात आपण आणखी चांगली कामगिरी करू अशी त्याला अपेक्षा आहे. टी-20 विश्वचषकात हार्दिकचा हेतू फक्त धावा काढण्यापुरता मर्यादित नाही. त्याला संघासाठी गोलंदाजीही करायची आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

बऱ्याच काळापासून पाठीच्या समस्येमुळे हार्दिक सामन्यादरम्यान खूपच कमी गोलंदाजी करत आहे. सध्या तो कसोटी संघाबाहेर आहे आणि जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू होईल. विश्वचषकातील सामने भारतात होणार होते, पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो देशाबाहेरच होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे हार्दिक या दिवसांत जबरदस्त मेहनत घेत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना हार्दिक म्हणाला की, “मी तुम्हाला खात्री देतो की, मी टी-२० विश्वचषकसाठी उपलब्ध आहे व मला प्रत्येक सामन्यात गोलंदाजी करायची आहे. मी याक्षणी माझी गोलंदाजी अधिक धारदार बनवित आहे. माझे संपूर्ण लक्ष सध्या टी-२० विश्वचषकावर आहे.”

हार्दिक पुढे म्हणाला की, “मी गोलंदाजीच्या नजरेने किती फिट आहे, हे महत्वाचे आहे. शस्त्रक्रियेनंतरही मी वेग गमावला नाही. माझी गोलंदाजी माझ्या फिटनेसवर अवलंबून आहे. मी जेवढा फिट असतो तितकीच चांगली कामगिरी करतो. ५० टक्के फिट असताना मी संघासाठी कधीही सामना खेळू शकत नाही. मी जेव्हा पूर्ण १०० टक्के फिट असेल तेव्हाच मी संघासाठी खेळेल ”

मागील वर्षी हार्दिक पांड्याला पाठीच्या दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर जेव्हा तो भारतीय संघामध्ये परत आला, तेव्हा गोलंदाजी करताना त्याला त्रास व्हायचा. ज्यामुळे तो फलंदाज म्हणून संघात खेळत राहिला. या दरम्यान, जेव्हा जेव्हा तो गोलंदाजी करत होता तेव्हा त्याला तितकी प्रभावी गोलंदाजी करता येत नव्हती.

महत्वाच्या बातम्या

वय विसरा! जेव्हा धोनीने दिली होती १२ वर्षे लहान असलेल्या हार्दिकला धावण्याच्या शर्यतीत मात

“विराटने आम्हाला सांगितलंय, कसोटी चॅम्पियनशीप एक महिन्याची नव्हे २ वर्षांची मेहनत”

आयपीएलचा नादच खुळा! खेळाडू तर खेळाडू, प्रशिक्षकसुद्धा करोडपती; पाहा त्यांचा पगार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---