पहिल्यांदा २००८ साली इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) स्पर्धा खेळवण्यात आली. जगभरातले सगळेच खेळाडू आयपीएलसाठी भारतात आले होते. भारतीय आणि परदेशी खेळाडू मिळून आईपीएलचा एक संघ अशी स्पर्धा सुरु झाली. त्यात ८ वेगवेगळ्या प्रमुख शहरांचे संघ आणि त्यांचे मालक असा एकंदरी आईपीएलचा आढावा तयार करण्यात आला. यात खूप खेळाडू लाखपती-करोडपती झाले. आईपीएलमध्ये कुठला खेळाडू किती कमवतो हे आपल्याला सर्वांना माहिती असते. पण त्या संघाचा प्रशिक्षक किती पगार घेतो, हे तुम्हला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया, अशा प्रशिक्षकांना जे खेळाडूंसारखे कमवतात कोट्यावधी रुपये.
१. अनिल कुंबळे– भारतीय संघाचा लेग स्पिनर अनिल कुंबळे सध्या पंजाब किंग्सचा प्रशिक्षक आहे. पंजाब किंग्सने अद्याप एकही आईपीएल ट्रॉफी जिंकली नाही. या संघाची मालकीण चित्रपट कलाकार ‘प्रीती झिंटा’ आहे. पंजाब किंग्स आपली पहिली आईपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्यामध्ये अनिल कुंबळेच मार्गदर्शन खूप उपयोगी आहे. पंजाब किंग्स अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदाचा पगार म्हणून ४ करोड रुपये देते. सर्वात जास्त पगार मिळणाऱ्या प्रशिक्षकात अनिल कुंबळेचा एक नंबर लागतो
२. रिकी पोंटिंग– जगातील सर्वात उत्तम कर्णधारामध्ये ज्याचं नाव नेहमीच पुढे राहिलं आहे, तो म्हणजे रिकी पोंटिंग. ऑस्ट्रेलिया संघासाठी आजवर रिकी पोंटिंगने २ विश्वचषक जिंकवून दिले आहेत. त्याची नेतृत्त्वाची शैली पाहता दिल्ली संघाने त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली. दिल्ली संघ रिकी पोंटिंगला एका आईपीएल मोसमासाठी ४ करोड रुपये देतो. रिकी पोंटिंग आईपीएल इतिहासातील सर्वोत्तम प्रशिक्षक राहिला आहे.
३. ब्रेन्डन मॅक्युलम– न्यूझीलंड संघाचा तडाखेबाज फलंदाज ब्रॅन्डन मॅक्युलम सध्या कोलकत्ता संघासाठी प्रशिक्षकपदाची भूमिका बजावतो आहे. दोन वेळा आईपीएल विजेता संघ कोलकत्ता आपली तिसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करतो आहे. गेली २ वर्ष कोलकत्ता संघ खराब कामगिरी करत आहे. संघाचा मालक शाहरुख असून शाहरुख ब्रेन्डन मॅक्युलमसाठी दरवर्षी ३.४ करोड रुपये मोजतो.
२. महेला जयवर्धने- ५ वेळा आईपीएल जिंकलेला संघ मुंबई इंडियन्स, आईपीएल इतिहासतील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. आईपीएलमधील सर्वात महाग आणि मोठी फ्रेंचाइजी म्हणून सुद्धा मुंबई इंडियन्सचे नाव पुढे असते. माजी श्रीलंका कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज महेला जयवर्धने या संघाचा प्रशिक्षक असून अंबानी त्याला दरवर्षी २.२५ करोड रुपये देतो.
१. सायमन कॅटिच– भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहलीचा हा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू अजूनही १३ वर्षात एकही आईपीएल ट्रॉफी जिंकू शकला नाही. बंगळूरू संघ सुद्धा आपल्या पहिल्या आईपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रतीक्षेत आहे. या संघाचा मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच आहे आणि बंगळूरू फ्रेंचाइजी त्याला दरवर्षी ४ करोड रुपये पगार म्हणून देतात.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविडने मॅचविनर खेळाडूंची रांग लावली, भारतीय संघाचं चित्र पालटलं; परदेशी खेळाडूकडून स्तुती
स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!
अश्विनला सर्वकालिन सर्वोत्तम न म्हणणाऱ्या मांजरेकरांचा बड्या खेळाडूकडून बचाव, म्हणाले…