---Advertisement---

दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड संघाची पाकिस्तानातून दुबईत सुखरुप लँडिग, ‘या’ दिवशी जाणार मायदेशी

---Advertisement---

पाकिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यात होणारी मर्यादित षटकांची मालिका रद्द झाली आहे. न्यूझीलँड संघाने सुरक्षेचे कारण देत ही मालिका ऐनवेळी रद्द केली आहे. त्यानंतर आता न्यूझीलँड संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानमधून उड्डाण भरली असून ते आता दुबईमध्ये दाखल झाले आहेत. न्यूझीलँडचा पूर्ण संघ चार्टर्ड विमानाने दुबईसाठी रवाना झाला होता. संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून एकूण ३४ सदस्य रात्री उशिरा दुबईमध्ये पोहचले आहेत. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ घरी जाण्यापूर्वी २४ तासांसाठी विलगीकरणात राहणार आहेत. त्यानंतर संघातील २४ सदस्य पुढच्या आठवड्यापर्यंत न्यूझीलँडला रवाना होतील.

न्यूझीलँड संघ पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडीमध्ये तीन एकदिवसीय आणि त्यानंतर लोहोरमध्ये पाच टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर न्यूझीलँडने सुरक्षेच्या कारणास्तव या मालिका खेळण्यास नकार दिला आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डाॅन’ला सांगितले की, “पाकिस्तान सरकार पीसीबी आणि सुरक्षा एजेंसी देशात पुन्हा क्रिकेट सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. न्यूझीलँड दौरा रद्द होणे या प्रयत्नांना एक मोठा झटका आहे.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1439352019337334793?s=20

पीसीबी अधिकाऱ्याने सांगितले की, “न्यूझीलँडविषयी आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलकडेही (आयसीसी) तक्रार केली आहे, पण तेथूनही आतापर्यंत आम्हाला कोणतीच मदत मिळाली नाही. आयसीसीमध्ये भारताचा दबदबा खूप जास्त आहे. अशात तेथून मदत मिळण्याचीही आशा पण नाही. याचा पूर्ण परिणाम पुढच्या मालिकेवरही पडेल. ऑक्टोंबरमध्ये इंग्लंडलाही पाकिस्तानमध्ये यायचे होते. मात्र, आता त्याचीही आशा नाही की, इंग्लंड संघ येईल की नाही?”

इंग्लंडच्या पुरुष संघाला पुढच्या महिन्यात पाकिस्तानमध्ये २ टी२० सामने खेळायचे आहेत. पण न्यूझीलँडने मालिका रद्द केल्यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यावरही शंका उपस्थित झाली आहे. इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ आणि पुरुष संघाला ऑक्टोंबरमध्ये पाकिस्तान दौरा करायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दहशतवादी हल्ल्यांमुळे क्रिकेटवर परिणाम झाल्याच्या ५ घटना; पाकिस्तान राहिलाय केंद्रबिंदू

दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर दिसले ‘असे’ दृश्य, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

अगग! पाकिस्तानचे इंग्रजीचे वांदे, ‘आम्ही न्यूझीलंडसाठी Fool प्रुफ नियोजन केले’ म्हणत झाले ट्रोल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---