---Advertisement---

T20 WC26: भारतच नाही ‘या’ संघांविरुद्धही नाबाद राहिला झिम्बाब्वेचा फलंदाज! ठोकल्या 292 धावा, दुर्मिळ पराक्रम नावावर

On: रविवार, मार्च 1, 2026 5:53 PM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये अनेक संघांचे सलामीवीर धावा करण्यात अपयशी ठरले काहींनी शतकी खेळी करत विजयांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. यामध्ये झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटची कामगिरी मात्र वेगळी आहे. त्याने या स्पर्धेत ६ संघांविरुद्ध खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने भारताविरुद्ध तर नाबाद ९७ धावा केल्या होत्या.

या विश्वचषकात झिम्बाब्वे आपला आज (१ मार्च) शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. दिल्लीमध्ये हा सामना खेळला जात असून यामध्ये बेनेट १५ धावा करत बाद झाला. या स्पर्धेत त्याची बाद होण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात बाद झाला होता. यावरून तो टी२० विश्वचषक २०२६मध्ये केवळ दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच बाद झाला आहे.

या स्पर्धेत बेनेटने ओमानविरुद्ध नाबाद ४८ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ६४ धावा आणि श्रीलंकेविरुद्ध नाबाद ६३ धावा केल्या आहेत. तो वेस्ट इंडिजविरुद्ध ५ धावा करत बाद झाला होता. याबरोबरच त्याने या स्पर्धेत ६ सामन्यातील ६ डावात २९२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३२ चौकार आणि ७ षटकार मारले आहेत. टी२० विश्वचषकात ह्या एका झिम्बाब्वेच्या खेळाडूने केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावा ठरल्या आहेत.

बेनेट या स्पर्धेत सलामीला येताना सर्वाधिक वेळा नाबाद राहिल्याने त्याची सरासरीही उत्तम राहिली आहे. सध्या तो सर्वोत्तम फलंदाजांची सरासरी असणाऱ्या यादीत १४६ सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर पहिल्या स्थानावर आहे. तसेच तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये पाकिस्तानचा साहिबजादा फरहान पहिल्या स्थानी आहे. त्याने ६ सामन्यात ३८३ धावा केल्या आहेत.

या स्पर्धेत झिम्बाब्वेने उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी करत विरोधी संघांना चकित केले होते. जेव्हा त्यांनी साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत स्पर्धेबाहेर केले तेव्हा त्यांच्या कामगिरीची खूप चर्चा झाली होती.

बेनेट सहापैकी ४ सामन्यात नाबाद राहिल्याने त्याला ‘फाइंड ऑफ द टुर्नामेंट’ (find of the tournament) म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---