---Advertisement---

ZIM vs PAK; झिम्बाब्वेने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्याच वनडे सामन्यावर वर्चस्व!

---Advertisement---

पाकिस्तान विरूद्ध झिम्बाब्वे (Pakistan vs Zimbabwe) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना (24 नोव्हेंबर) रोजी खेळला गेला. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. वास्तविक, पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केला. पावसाचा व्यत्यय असलेला हा सामना झिम्बाब्वेने डीएलएस पद्धतीने 80 धावांनी जिंकला.

सामन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. मात्र, सलामीवीर तदिवनाशे मारुमणी आणि जॉयलॉर्ड गुंबीने वेगवान सुरुवात करून यजमानांना 50 धावांच्या पुढे नेले. मात्र गैरसमजामुळे गुंबी धावबाद झाला. यानंतर पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज सलमान अली आगा आणि सॅम अयुब यांनी झिम्बाब्वेच्या मधल्या फळीवर दबाव आणला. कर्णधार क्रेग एर्विन आणि डिऑन मायर्स हेही फार काळ टिकू शकले नाहीत.

झिम्बाब्वेला 150 धावांपर्यंतही मजल मारता येणार नाही असे वाटत असतानाच सिकंदर रझा आणि रिचर्ड नगारावा यांनी 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नागरवाने पाकिस्तानी गोलंदाजांचा धैर्याने सामना करत 48 धावा केल्या, तर सिकंदर रझाने (Sikandar Raza) 49 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या मदतीने झिम्बाब्वेने 205 धावांपर्यंत मजल मारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खूपच खराब झाली. वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानीने अब्दुल्ला शफीकला खाते न उघडता बाद केले आणि त्यानंतर लगेचच सॅम अयुबही बाद झाला. यानंतर झिम्बाब्वेच्या फिरकीपटूंनी कहर केला. शॉन विल्यम्स आणि सिकंदर रझा या जोडीने पाकिस्तानची मधली फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. विल्यम्सने कामरान गुलाम आणि इरफान खानला तंबूत पाठवले, तर रझाने सलमान अली आगा आणि हसिबुल्ला खान यांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. अखेर झिम्बाब्वेने पहिला वनडे सामना डीएलएस (DLS) पद्धतीने 80 धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Mega Auction; मुंबई इंडियन्स नाही, तर ‘या’ संघाकडून खेळणार इशान किशन!
व्यंकटेश अय्यरवर लिलावात लागली 23.75 कोटींची बोली, ‘या’ संघातून खेळताना दिसणार
आनंदाची बातमी! मेगा लिलावादरम्यान जय शाहंच्या घरी पाळणा हलला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---