---Advertisement---

पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2024 10:09 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (5 डिसेंबर) खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे पाकिस्ताननं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. पाकिस्ताननं मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. या दौऱ्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानवर दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. याआधी वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा 80 धावांनी पराभव केला होता.

आजच्या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 132 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेनं एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. 133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली. ब्रायन बेनेट आणि तदिवनाशे मारुमणी यांच्यात पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी झाली. मारुमणी 6 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. ब्रायननं 35 चेंडूत 43 धावांची खेळी खेळली. डिऑन मायर्सनं 18 चेंडूत 13 धावा केल्या. वेस्ली मधवेरेनं 7 चेंडूंत 7 धावा केल्या. रायन बर्लनं 6 धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझानं 20 चेंडूत 19 धावा केल्या. वेलिंग्टन मसाकादजा 4 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. ताशिंगा मुसेकिवानं 17 चेंडूत 7 धावा केल्या. पाकिस्तानसाठी अब्बास आफ्रिदीनं 4 ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 132 धावा केल्या होत्या. उमर युसूफला खातंही उघडता आलं नाही. फरहानला 7 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या. यष्टिरक्षक उस्मान खाननं 5 तर तय्यबनं 21 धावा केल्या. कासिम अक्रमनं 15 चेंडूत 20 धावांची खेळी खेळली. कर्णधार सलमान आगानं 32 चेंडूत 32 धावा केल्या. अब्बास आफ्रिदी 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. झिम्बाब्वेकडून मुझाराबानीनं दोन बळी घेतले.

हेही वाचा – 

4 षटकार अन् 9 चौकार, अजिंक्य रहाणेचं रौद्र रुप पाहून गोलंदाजांना काहीच सुचेना!
आयपीएल फ्रॅन्चाईजींंची ब्रॅन्ड व्हॅल्यू जाहीर; मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी, पहिल्या क्रमांकावर कोणती टीम?
ब्रेट लीचा खतरनाक चेंडू अन् कमेंटेटरचा डोळा थोडक्यात वाचला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---