डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे श्रीलंका संघावर ४ विकेट्सने मात करत झिम्बाब्वे संघाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. एरिव्हन आणि मेईर यांच्या खेळीमुळे झिम्बाब्वे हा विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाने निर्धारित ५० षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात ३०० धावा केल्या. त्यात सलामीवीर डिकवेळला याने खणखणीत शतक झळकावत ११८ चेंडूत ११६ धावांची खेळी केली तर दुसरा सलामीवीर गुणातिल्काने १०१ चेंडूत ८७ धावांची खेळी केली.
डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ३१ षटकांत २१९ धावांच लक्ष घेऊन मैदानात झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी १० षटकांत ६७ धावांची भागीदारी केली. त्यांनतर नियमित अंतराने विकेट पडूनही झिम्बाब्वेने २ षटके राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेकडून इरविनने ६९, मेईरने ४३ तर मुसाकाण्डाने ३० धावांची खेळी केली.
या विजयाबरोबर झिम्बाब्वेने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून शेवटचा निर्णायक सामना १० जुलै रोजी होणार आहे.