सध्या झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात झिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलियाला पार धुळीस मिळवल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांपुढे अक्षरक्ष: गुडघे टेकले. ऑस्ट्रेलिया संघाकडून डेविड वॉर्नरने 94 धावांची खेळी केली मात्र, तरीही संघाला केवळ 141 धावांत डाव संपवावा लागला. त्यानंतर झिम्बाब्वे संघाने 3 विकेट राखत ऑस्ट्रेलिया संघाचा दारून पराभव केला.
#3rdODI | Historic! 🇿🇼 Zimbabwe beat 🇦🇺 Australia by 3 wickets to record their first win over Australia on Australian soil! 💪
Australia however take the series 2⃣-1⃣ #AUSvZIM | #VisitZimbabwe pic.twitter.com/u5KA7Zlp10
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) September 3, 2022
या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली. यावेळी रायन बर्ल याने एकट्याच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाच्या 5 खेळाडूंना माघारी धाडले. त्यानंतर 142 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघासाठी कर्णधार चकाबावाने सर्वाधिक नाबाद 37 धावा केल्या आणि झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वे संघाचा ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरील हा पहिला विजय आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नोट करा! सुपर-4 मध्ये पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान, असे आहे संपूर्ण वेळापत्रक
ऑस्ट्रेलियाला एकाच खेळाडूत मिळाला हार्दिक आणि पोलार्ड! मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन
पाकिस्तानी दिग्गज झालाय सूर्याच्या खेळाचा चाहता! स्वत: केले त्याच्या खेळीचे कौतुक