झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत पहिल्या फेरीचे सामने सोमवारी (26 जून) समाप्त झाले. पहिल्या फेरीचा अखेरच्या सामन्यात यजमान झिम्बाब्वे संघाचे अमेरिकेवर तब्बल 304 धावांनी विजय मिळवत सुपर सिक्ससाठी पात्रता मिळवली. हा वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काहीशा दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अमेरिका संघाविरुद्ध त्यांनी तुफानी फलंदाजी केली. काया व गुंबी या जोडीने त्यांना अर्धशतकी सलामी दिली. गुंबीने 78 धावांची खेळी केली. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनुभवी सीन विल्यम्सने वादळी फटकेबाज करताना अवघ्या 101 चेंडूंमध्ये 174 धावांची तुफानी खेळी केली. या संपूर्ण स्पर्धेत चमकत असलेला अष्टपैलू सिकंदर रझा याने देखील 48 धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेल्या रेयान बर्लने अवघ्या 16 चेंडूंमध्ये 47 धावा कुटल्या. या सर्वांच्या योगदानामुळे संघाने 408 पर्यंत मजल मारली. ही झिम्बाब्वे क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी वनडे धावसंख्या ठरली.
या धावसंख्येचा पाठलाग करताना अमेरिका संघ कुठेही स्पर्धेत दिसला नाही. त्यांचे केवळ तीन फलंदाज अर्धशतक झळकावू शकले. अमेरिकेसाठी अभिषेक पराडकर याने सर्वाधिक 24 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेसाठी सर्व गोलंदाजांनी बळी मिळवत अमेरिकेचा डाव केवळ 104 धावांवर संपुष्टात आला.
झिम्बाब्वे क्वालिफायर स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या चारही सामन्यात विजय मिळवणारा एकमेव संघ ठरला. त्यानंतर आता सुपर सिक्स फेरीत ते आणखी तीन सामने खेळतील. सुपर सिक्स फेरीत अव्वल दोन राहणारे संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरतील.
(Zimbabwe Register Biggest Win Over USA In ODI World Cup Qualifiers)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ 12 शहरात खेळले जाणार वनडे विश्वचषक 2023चे सर्व सामने, एका क्लिकवर घ्या जाणून
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा