भारतीय संघ रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीचा अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य सामन्यात पोहोचेल. या सामन्यापूर्वी झिम्बाब्वे संघाचा कर्णधार क्रेग इर्विन याने म्हटले आहे की, पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्यांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. तसेच, ते कोणत्याही संघाविरुद्ध विजय मिळवू शकतो.
खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला
झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विन (Craig Ervine) याने म्हटले की, “पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आम्हाला विश्वास झाला आहे की, आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध विजय मिळवू शकतो. भारताविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या सामन्यामध्येही आमचा विश्वास कायम राहील. या सामन्यात आम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंसमोर खेळू. शेवटी विराट कोहली याला बाद करण्याची संधी कधी मिळते. मला पूर्ण विश्वास आहे की, या सामन्यासाठी आमचे वेगवान गोलंदाज खूपच उत्साहित असतील.”
भारतीय संघाची टी20 विश्वचषकातील कामगिरी
या टी20 विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर भारताने विजयी सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला 4 विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यात विराट कोहली याने नाबाद 82 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. त्यानंतर भारतीय संघाने नेदरलँड्सविरुद्ध 56 धावांनी विजय मिळवला होता.
पुढे तिसरा सामना भारतासाठी दुर्दैवी ठरला. या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताने 5 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर आता भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी झिम्बाब्वे संघाचा सामना करावा लागणार आहे.
विशेष म्हणजे, झिम्बाब्वे संघाने या टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाला पराभूत करून सर्वांनाच हैराण केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप ठरूनही कार्तिकला मिळाला भारतीय दिग्गजाचा भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘इतर खेळाडूही फ्लॉप…’
श्रीलंकेला नमवत इंग्लंड सेमी-फायनलमध्ये! यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात