टी20 क्रिकेटमध्ये रोज कोणते ना कोणते रेकॉर्ड बनतात. आता झिम्बाब्वेच्या संघानं एक मोठा रेकॉर्ड केला आहे. झिम्बाब्वेनं आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकच्या आफ्रिका क्वालिफायर सामन्यात टी20 क्रिकेट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा स्कोर रचला. भारतानं नुकताच बांगलादेशविरुद्ध 297 धावा ठोकून टी20 मधील दुसरा सर्वात मोठा स्कोर केला होता. झिम्बाब्वेचा संघ या स्कोरपासून केवळ 11 धावा दूर राहिला. झिम्बाब्वेनं सेशेल्स विरुद्ध 20 षटकांत 286 धावा केल्या. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, या दरम्यान झिम्बाब्वेच्या एकाही फलंदाजानं शतक ठोकलं नाही!
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचे सलामीवीर ब्रायन बेनेट आणि तदिवानाशे मारुमनी यांच्या सलामी जोडीनं शानदार सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी फक्त 9.4 षटकांत 145 धावा जोडल्या. बेनेटनं 35 चेंडूत 91 तर मारुमनीनं 37 चेंडूत 86 धावा केल्या. यानंतर कर्णधार सिकंदर रझा (13 चेंडूत 36 धावा) यानं मधल्या फळीतील फलंदाजांशी मिळून संघाचा स्कोर 286 पर्यंत पोहचवला.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या स्कोरचा रेकॉर्ड नेपाळच्या नावे आहे. त्यांनी 2023 आशियाई खेळांदरम्यान मंगोलियाविरुद्ध 20 षटकांत 314 धावा केल्या होत्या. नेपाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव संघ आहे, ज्यांनी 300 धावांचा आकडा पार केला आहे. भारत या लिस्टमध्ये 297 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा स्कोर
314 – नेपाळ विरुद्ध मंगोलिया, 2023
297 – भारत विरुद्ध बांगलादेश, 2024
286 – झिम्बाब्वे विरुद्ध सेशेल्स, 2024
278 – अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, 2019
झिम्बाब्वे विरुद्ध सेशेल्स सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, झिम्बाब्वेनं या सामन्यात डकवर्थ लुईस नियामाच्या आधारे विजय मिळवला. सामन्यात पावसानं खोळंबा घातला तोपर्यंत सेशेल्सनं 6.1 षटकांत 2 गडी गमावून 18 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
निवडकर्ते लक्ष द्या…ऋतुराज गायकवाडनं ठोकलं आणखी एक शतक! आता तरी संधी मिळणार का?
जगाला मिळणार नवा टी20 चॅम्पियन, या दोन संघांमध्ये विजेतेपदाची टक्कर
रमणदीप जोमात, पाकिस्तान कोमात, भारताच्या खेळाडूचा हवेत उडी मारत अप्रतिम झेल! पाहा VIDEO