---Advertisement---

रमणदीप जोमात, पाकिस्तान कोमात, भारताच्या खेळाडूचा हवेत उडी मारत अप्रतिम झेल! पाहा VIDEO

On: रविवार, ऑक्टोबर 20, 2024 10:27 AM
---Advertisement---

यंदाच्या इमर्जिंग आशिया कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार खेळ करत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवत 183 धावांची मोठी धावसंख्या उभारली. टीम इंडियाकडून कर्णधार तिलक वर्माने सर्वाधिक 44 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 176 धावा करू शकला. या सामन्यात रमणदीप सिंगने अशक्यप्राय झेल घेतले.

दुसऱ्या डावाच्या 9व्या षटकात निशांत संधूच्या चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज यासिर खानने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. शॉटही तसा चांगलाच वाटला. पण भारतीय क्षेत्ररक्षक रमणदीप सिंग पूर्णपणे तयार होता. धावत असतााना त्याने हवेत उडी मारली आणि उडताना कॅच पकडले. विशेष म्हणजे त्याने हा कॅच एका हाताने पकडला आणि शरीराचा तोल सांभाळत चेंडू हातातून निसटू दिला नाही. त्याच्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ-

रमणदीप सिंगच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, रमणदीप सिंगचा झेल भारतीयाने घेतलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या झेलांपैकी एक मानला जाईल.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी छोट्या पण महत्त्वाच्या खेळी केल्या. अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. तर अभिषेकने 35 आणि प्रभसिमरन सिंगने 36 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली होती. या दोघांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता. नेहल वढेराने 25 धावांचे योगदान दिले. याशिवाय उत्कृष्ट झेल घेणाऱ्या रमणदीप सिंगने 17 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली.

हेही वाचा-

टीम इंडियाने 100 वर्ष जुना विश्वविक्रम मोडला, भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम
गिल दुसऱ्या कसोटीसाठी उपस्थित! या खेळाडू्चा पत्ता कट? सर्फराजच्या शतकामुळे कर्णधाराची डोकेदुखी वाढली
आधी वरिष्ठ, नंतर महिला, आता युवांनी पाकिस्तानला चिरडले; वर्षाभरात भारताने PAK ला इतक्यांदा हरवले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---