---Advertisement---

वैभव सूर्यवंशीची कमकुवत बाजू उघड! शॉर्ट बॉलवर मात करण्यासाठी दिग्गजाचा गेमचेंजर सल्ला

On: रविवार, जुलै 26, 2026 2:25 PM
---Advertisement---

भारतीय वरिष्ठ संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये युवा स्टार वैभव सूर्यवंशी, पुन्हा एकदा शॉर्ट बॉलविरुद्ध संघर्ष करताना दिसला. तो झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 9 चेंडू खेळत 20 धावांवर बाद झाला. यावेळी त्याचा डाव शॉर्ट बॉलवरच संपुष्टात आला. इंग्लंड दौऱ्यातही तो असाच बाद झाला होता. त्याच्या या अडचणीवर माजी भारतीय खेळाडूने उपाय सुचविला आहे.

वैभव डावाची सुरूवात उत्तम करतो, मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. इंग्लंड दौऱ्यातही जोफ्रा आर्चरने त्याला शॉर्ट बॉलवर बाद केले होते. आता झिम्बाब्वे दौऱ्यातही तो तसाच बाद होत असल्याने त्याच्या या समस्येवर सबा करीम यांनी एक उपाय सांगितला आहे.

माजी भारतीय विकेटकीपर-फलंदाज सबा करीम यांच्या मते, भविष्यात जवळपास सर्वच वेगवान गोलंदाज वैभवविरुद्ध शॉर्ट बॉलचा वापर करतील. त्यासाठी त्याला स्वत: च त्यावर तोडगा काढावा लागेल.

“वैभवमध्ये असलेली क्षमता आणि प्रतिभा पाहता, तो लवकरच ही शॉर्ट बॉलची कमतरता दूर करेल. खेळाडूने आपल्या उणिवा ओळखून त्या स्वत: च दूर केल्या तर त्यांची कारकिर्द दिर्घकाळ टिकते,” असे सबा करीम यांनी म्हटले आहे.

“आजकाल, सर्वच जण विरोधी संघांच्या खेळाडूंच्या खेळण्याच्या अभ्यास बारकाईने करतो आणि त्यावर आपली रणनीती तयार करतात. त्यामुळे विरोधी संघांच्या योजना समजून त्यानुसार आपल्या खेळात बदल करण्याची क्षमता हीच वैभवची खरी कसोटी असेल,” असेही सबा करीम पुढे म्हटले आहेत.

विदेशी खेळपट्ट्यावर चेंडू अधिक उसळी घेतो. त्यामुळे तेथे शॉर्ट बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाजांकडे स्पष्ट योजना असणे आवश्यक. वैभव शॉर्ट बॉल खेळण्यास सक्षम नाही, कारण टी 20 क्रिकेटमध्ये झटपट धावा करण्याचा दबाव असतो आणि धोका पत्करात, ज्यामुळे तो लवकरच विकेट गमावून बसतो.

सबा करीम यांनी वैभवने त्याच्या खेळीत सुधारणा केली असल्याचे वक्तव्य करताना म्हटले, “वैभवने आपला खेळ सुधारण्याचे प्रयत्न केले आहे. अलीकडच्या सामन्यांमध्ये तो अप्पर कटसारखे फटके खेळत आहे. यावरून तो आपल्या कमकुवत बाजूवर सुधारणा करताना दिसत आहे. त्याने शॉर्ट बॉलच्या वेळी कोणता खेळावा आणि कोणता खेळू नये, ही रणनीती त्याने आखली तर त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल.”

तसेच सबा करीम यांनी तो झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात चुकीचा शॉट खेळला, म्हणून विकेट गमावून बसला असे मत मांडले आहे. (ZIMvsIND: Vaibhav Sooryavanshi’s weakness exposed! Saba Karim’s game-changing advice to tackle short ball.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---