---Advertisement---

जेव्हा धोनीची मुलगी सीएसकेला नाही तर मुंबई इंडियन्सला करते चिअर, रोहित शर्माने शेअर केला व्हिडिओ

On: गुरूवार, जून 17, 2021 2:30 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. तसेच एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.तर, चेन्नई सुपर किंग्स संघाने हा कारनामा ३ वेळेस केला आहे. दोन्हीही संघ आयपीएल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान हा सामना हाय वोल्टेज सामना असतो. परंतु, आयपीएल स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई हा सामना हाय वोल्टेज सामना असतो.

असे असताना धोनीची मुलगी झिवा एकदा मुंबई इंडियन्सला चिअर करताना दिसून आली होती. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शेअर केला होता.

रोहितने शेअर केला होता व्हिडिओ

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने २०१८ मध्ये आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये झिवा धोनी मुंबई इंडियन्स संघाला चियर करताना दिसून आली होती. झिवाने २०१८ साली झालेल्या आयपीएलच्या हंगामात पहिल्यांदाच हजेरी लावायला सुरुवात केली होती. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झिवा जोरजोरात ओरडून,”मुंबई इंडियन्स .. मुंबई इंडियन्स” असे म्हणत आहे. हा व्हिडिओ शेअर करत रोहित शर्माने, एमएस धोनी आणि साक्षी सिंग धोनीला ही टॅग केले होते. (Ziva Dhoni cheering Mumbai Indians)

लवकरच होणार आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना प्रारंभ
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. कोरोनाने बायो बबल भेदून स्पर्धेत शिरकाव केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

पण आता या स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. हे हंगाम स्थगित होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता तर गतवर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमाकांवर होता.

महत्त्वाच्या बातम्या –

गावसकरांचा सल्ला, ‘त्या’ दोन खेळाडूंना WTC फायनलमध्ये टीम इंडियाकडून जरूर खेळवा

भारतीय संघाच्या मदतीला आला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिले महत्वाचे सल्ले

घे बाबा रुमाल आणि खेळ! हसन अली आणि बाबार आझमचा मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---