---Advertisement---

Video: एमएस धोनीच्या चिमुकलीचा हार्दिक पंड्याला जोरदार पाठिंबा

On: शनिवार, जून 30, 2018 3:45 PM
---Advertisement---

भारताचा आयर्लंड दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची उत्कृष्ट कामगिरी पहायला मिळाली. 29 जूनला पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात हार्दिकने स्पोटक फलंदाजी करताना 10 चेंडूतच नाबाद 38 धावा केल्या.

त्याबरोबरच त्याने गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली. या सामन्यात भारताने 143 धावांनी आयर्लंडवर विजय मिळवत 2 सामन्यांची टी20 मालिका 2-0 अशी जिंकली.

या विजयानंतर हार्दिकने त्याच्या चांगल्या फॉर्मचे श्रेय भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची 3 वर्षांची मुलगी झीवाला दिले. त्याने इंस्टाग्रामवरुन झीवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ धोनीची पत्नी साक्षी धोनीने काढला आहे. या व्हिडिओमध्ये झीवा “कमआॅन! कमआॅन, हार्दिक” असे म्हणत हार्दिकला पाठिंबा देताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BknuIqeBtcI/?hl=en&taken-by=hardikpandya93

याबरोबरच हार्दिकने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘मला वाटते की माझ्यासाठी मला चिअरलीडर मिळाली आहे.”

हार्दिकने या मालिकेत 380 च्या स्ट्राईक रेटने 38 धावा केल्या आहेत. आता भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 3 जुलैपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय खेळडूंनीच विराट कोहलीला अडकवले मोठ्या संकटात

विराट कोहलीच्या बाबतीत असे दुसऱ्यांदाच घडले!

टॉप 5: दुसऱ्या टी20 मध्ये भारतीय संघाने केले हे खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment