Loading...

धोनीची लेक झिवा रणवीर सिंगला ‘हे’ वाक्य नक्कीच बोलून दाखवणार…

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक एमएस धोनीची साडेचार वर्षांची मुलगी झिवा अनेकदा तिच्या गोड फोटोंमुळे किंवा व्हिडिओमुळे चर्चेत असते. नुकतीच ती धोनीने केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

धोनीने तिचा आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा कोलाज फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिवा आणि रणवीरने सारखाच गॉगल घातल्याचे दिसत आहे.

या फोटोमागील कारण सांगताना धोनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘झिवाला असे वाटले की त्याने(रणवीरने) माझा गॉगल का घातला. म्हणून तीने तिचा गॉगल शोधला आणि अखेर म्हणाली माझा गॉगल तर माझ्याकडेच आहे.’

Loading...

‘आत्ताची मुले वेगळी आहेत, साडेचार वर्षांचा असताना मला हे कळालेही नसते की माझा गॉगल कोणासारखातरी आहे. मला खात्री आहे पुढच्या वेळी जेव्हा ती रणवीरला भेटेल तेव्हा ती त्याला म्हणेल तूझ्यासारखाच गॉगल माझ्याकडेही आहे.’

धोनीच्या या पोस्टवर रणवीरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘हाहाहाहा, फॅशनिस्टा Z’

Loading...
Screengrab: Instagram/mahi7781

धोनीने सध्या क्रिकेटमधून विश्रांती घेतलेली आहे. तो भारताकडून शेवटचा सामना २०१९ विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे.

You might also like
Loading...