भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी टी२० विश्वचषकात खेळला जाणार आहे. परंतु या सामन्याआधीच सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये वाद झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंपासून चाहते आपापल्या संघांना पाठिंबा देत आहेत आणि आता दोन्ही देशांच्या अन्न वितरण अॅप्सनेही या विशेष लढाईत उडी घेतली आहे. झोमॅटो आणि करीम पाकिस्तान यांच्यात आगळेवेगळे ट्विटर वॉर सामन्यापूर्वी एक दिवस आधीच सुरू झाले आहे.
झोमॅटो व करीम पाकिस्तानचे ट्विटर वॉर
याची सुरुवात करीम पाकिस्तानने केली होती, त्यांनी ट्विट करताना लिहिले लिहिले, ‘फुकट खाण्याची संधी आणि जिंकण्याची संधी. पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्याच्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत जेवण मागवा आणि पाकिस्तान जिंकल्यास आम्ही तुमचे पैसे परत करू.’
https://twitter.com/CareemPAK/status/1451820753876357120?t=Lgu1e_zDVa2KAHHZFU5ZFw&s=19
यानंतर झोमॅटोने ट्विटरवर लिहिले, ‘जर पाकिस्तानी क्रिकेटपटूंना बर्गर पिझ्झा खायचा असेल तर आम्हाला डायरेक्ट मेसेज करा.’
https://twitter.com/zomato/status/1451906541456539654?t=20V7MH4XxIV0Vh8Rxx9tXw&s=19
२०१९ च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर, पाकिस्तानच्या एका चाहत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. तो चाहता अत्यंत काकुळतीने ‘आमच्या खेळाडूंना फिटनेसची अजिबात काळजी नाही आणि मॅच होण्याच्या एक दिवस आधी हे सर्व बर्गर पिझ्झा खात होते.’ असे म्हणताना दिसलेला.
करीम पाकिस्तानला झोमॅटोचे हे ट्विट आवडले नाही. त्याला उत्तर देताना त्यांनी लिहिले की, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना सामन्यानंतर बर्गर पिझ्झा आणि तुमच्यासाठी मस्त चहा पाठवू.’
भारतासमोर विजयी इतिहास कायम राखण्याचे आव्हान
भारतीय संघाचा व पाकिस्तानचा आत्तापर्यंत टी२० विश्वचषकात पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या सर्व वेळी भारतीय संघाने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. भारताने २००७ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानलाच पराभूत करत पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१२, २०१४ व २०१६ असे सलग तीन वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.