---Advertisement---

पंजाब दिल्ली सामन्यात अंपायरलाच ‘मॅन ऑफ द मॅच’ द्या, माजी दिग्गज कडाडला

---Advertisement---

मुंबई । रविवारी आयपीएल 2020 च्या अत्यंत रोमांचक सामन्यात दिल्लीच्या कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळाला. 20-20 षटकांत सामना बरोबरीत सुटला. यानंतर सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये झाला. जिथे दिल्लीचा संघ जिंकला. पण दिल्लीच्या विजयावर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक माजी क्रिकेट दिग्गज आणि चाहते आरोप करीत आहेत की, पंचाच्या एका चुकीमुळे पंजाब संघाला हा सामना गमावावा लागला. खरं तर पंचांनी पंजाबच्या एका धावेला शॉर्टरन (धाव पूर्ण नाही) दिली होती. परंतु रिप्लेमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की ती धाव शॉर्ट रन नव्हते.

157 धावांचे लक्ष्य पंजाबच्या विजयासाठी होते. पंजाबला शेवटचे 10 बॉल जिंकण्यासाठी 21 धावा कराव्या लागल्या.  मयंक अगरवाल ज्या पद्धतीने फलंदाजी करीत होता, त्यात पंजाबचा विजय निश्चित दिसत होता. कागिसो रबाडा 19व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. अगरवालने त्याच्या दुसर्‍या चेंडूवर सणसणीत चौकार लगावला.

रबाडाचा पुढचा चेंडू यॉर्करचा होता. अग्रवालने मिडऑनच्या दिशेने दोन धावा पूर्ण केल्या.  ख्रिस जॉर्डन दुसर्‍या टोकाकडून फलंदाजी करीत होता.  परंतु पंच नितीन मेननने त्याला शॉर्ट रन म्हटले.  दुसर्‍या अंपायरशी तो बोलला आणि म्हणाला की, जॉर्डनने पहिले धाव पूर्ण करताना बॅट क्रीजच्या आत ठेवली नाही. अशा परिस्थितीत पंजाबला येथे फक्त 1 धावा देण्यात आल्या. जॉर्डनची ही धाव शॉर्ट रन नव्हती, हे टीव्हीच्या स्लो मोशन रीप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्याने बॅट व्यवस्थित ठेवली. तर एक धाव कमी पडल्यामुळे सामना टाय झाला.

पंचांच्या या चुकीवर निर्णयावर वीरेंद्र सेहवाग चांगलाच भडकला आहे. सेहवाग हा पंजाबचा प्रशिक्षकही होता. पंचांच्या निर्णयावर टीका करताना तो म्हणाला, ”सामनावीरचा पुरस्कार देण्याच्या निर्णयावर मला फारसा आनंद नाही. मॅन ऑफ द मॅचचे खरे हक्कदार पंच आहे. ते शॉर्ट रन नव्हते. या फरकाने पंजाबचा संघ सामना गमावला.”

सामन्याचा निकाल

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 157 धावा केल्या, प्रत्युत्तरात पंजाबचा संघही 157 धावा करू शकला. सामना सुपर आव्हरमध्ये गेला, तेथे कागिसो रबाडाने पंजाबचा डाव केवळ तीन चेंडूंत संपवला. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी पंजाबने दिल्लीला अवघ्या 3 धावांचे लक्ष्य दिले, जे त्यांनी 2 चेंडूमध्ये मिळवले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---