आयपीएल 2023 मध्ये रविवारी (7 मे) पहिला सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स आणि तिसऱ्या क्रमांकावरील लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान होणार आहे. हा सामना एका अर्थाने विशेष ठरेल. या सामन्यात गुजरातचे नेतृत्व हार्दिक पंड्या तर लखनऊचे नेतृत्व त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या करेल. आयपीएल इतिहासात प्रथमच दोन भाऊ अशाप्रकारे एकमेकांसमोर येणार आहेत.
भाऊ आतापर्यंत एकमेकांविरुद्ध अथवा एका संघातून खेळले आहेत. पहिल्या हंगामात इरफान पठाण हा पंजाब किंग्स तर युसुफ पठाण हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्यानंतर शॉन मार्श व मिचेल मार्श हे बंधू देखील आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांसाठी खेळले. दक्षिण आफ्रिकेचे मॉर्नी मॉर्कल व एल्बी मॉर्कल यांनी देखील आयपीएलमध्ये आपले कसब दाखवले आहे. दुसरीकडे हार्दिक व कृणाल हे पाच वर्ष मुंबई इंडियन्ससाठी एकत्रित खेळत होते. मात्र, मागील वर्षी हार्दिक गुजरात तर कृणाल लखनऊचा भाग झाला.
या हंगामात लखनऊचे नेतृत्व केएल राहुल याच्या हाती होते. मात्र, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने तो उर्वरित हंगामातून बाहेर पडला. त्याच्याजागी कृणालला संघाचे कर्णधार बनवण्यात आले.
रविवारी होणाऱ्या सामन्यात हे दोन्ही भाऊ आपले घरचे मैदान असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरतील. हार्दिक याने मागील वर्षी प्रथमच कोणत्याही स्तरावर कर्णधारपद भूषवले होते. आयपीएल संघाचे कर्णधारपद मिळवल्यानंतर त्याने थेट विजेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. दुसरीकडे कृणाल याने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघाचे नेतृत्व केले आहे.
(First Time Ever In IPL History Brothers Lead Teams Hardik Pandya Gujarat Titans Krunal Pandya Lucknow Supergiants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल मिल गये! गांगुली-विराटने सामन्यानंतर केला हॅंडशेक, वादावर पडला पडदा
पथिरानाची कारकीर्द वाढवण्यासाठी धोनीने उचलले पाऊल! श्रीलंका क्रिकेट बोर्डाला केली ही विनंती