आयपीएल 2023 मध्ये गत विजेत्या गुजरात टायटन्स संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. गुजरातला सहा सामन्यात तीन विजय व तीन पराभवांना सामोरे जावे लागले. संघासमोरील आव्हान वाढत असतानाच आता स्पर्धेचा मुख्य टप्पा सुरू होण्या वेळी संघाला आणखी एक धक्का बसणार आहे. या हंगामात गुजरात साठी खेळत असलेला आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल हा आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आपल्या मायदेशी परतणार आहे.
📡: SQUADS ANNOUNCED
The Ireland Men's squad for the ODI series against Bangladesh and the Ireland Wolves squad for the warm-up match have been named.
➡️ Find out here: https://t.co/Un5SY1z5YM#BackingGreen pic.twitter.com/rAWfJ5tedS
— Cricket Ireland (@cricketireland) April 21, 2023
जोशुला लिटल हा आयर्लंड संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. आयलँड संघाला मे महिन्यात बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी नुकतीच आयर्लंड संघाची संघनिवड केली गेली. त्या संघात लिटल याला स्थान मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे त्याला आपल्या देशासाठी खेळणे भाग असेल.
लिटल याला आयपीएल लिलावात 4 कोटी 40 लाख अशी मोठी रक्कम देत गुजरातने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. त्याने चार सामन्यात गुजरातसाठी तीन बळी मिळवले असून, त्याची इकॉनॉमी देखील चांगली राहिली आहे.
आयर्लंड व बांगलादेश यांच्या दरम्यानची ही मालिका आयर्लंडमध्ये खेळली जाईल. ही मालिका 9 मे रोजी सुरू होऊन 14 मे रोजी समाप्त होईल. त्यामुळे लिटल गुजरातसाठी तीन सामने मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत गुजरातसाठी अल्झारी जोसेफ हा मैदानात उतरू शकतो. ही मालिका आयर्लंड संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मालिकेत 3-0 असा विजय मिळवल्यास आयर्लंड आगामी वनडे विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल. पुढील वनडे विश्वचषक भारतात ऑक्टोबरनोव्हेंबर महिन्यात खेळला जाईल. आयर्लंड मागील विश्वचषकासाठी पात्र ठरविण्यात अयशस्वी ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जेव्हा धोनी निघून जाईल, तेव्हा त्याचे महत्त्व कळेल…’, इंग्लंडच्या दिग्गजाची भावूक करणारी प्रतिक्रिया
बीसीसीआयपुढे नमलं पाकिस्तान! आशिया चषकासाठी आला नवीन प्रस्ताव, जाणून घ्याच