ठाणे हम्पी हिरोज विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात झालेली लढत सुरुवातीला चुरशीची सुरू होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मंगेश सोनावणे चतुरस्त्र चढाया करत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरा पर्यत थांर हम्पी हिरोज संघाकडे 20-9 अशी आघाडी होती.
मंगेश सोनावणे सोबत विघ्नेश चौधरी, चिन्मय गुरव यांनी चपळ चढाया करत गुण मिळवले. सामन्याची शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना 33-14 अशी आघाडी होती. ठाणे संघाने संपूर्ण सामन्यात नाशिक संघावर 3 लोन पडत सामना 47-24 असा जिंकला.
ठाणे हम्पी हिरोज संघाकडून मंगेश सोनावणे ने सुपर टेन करत चढाईत 13 गुण मिळवले. त्याला चिन्मय गुरव ने 7 गुण मिळवत चांगली साथ दिली. अहमद इनामदार ने 4 तर प्रथमेश बालेकुंदरी ने 3 पकडी केल्या. नाशिक कडून गणेश गीते ने चांगला खेळ केला. या विजयासह ठाणे संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहचला.
बेस्ट रेडर- मंगेश सोनावणे, ठाणे हम्पी हिरोज
बेस्ट डिफेंडर्स- अहमद इनामदार, ठाणे हम्पी हिरोज
कबड्डी का कमाल- चिन्मय गुरव, ठाणे हम्पी हिरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
परभणी पांचाला प्राईड ची धुळे चोला वीरांस संघावर मात
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाचा सलग दुसरा विजय