ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगलोरमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांना डावाची सुरुवात वादळी खेळीसह केली. दोघांच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियन संघ निर्धारीत 50 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 367 धावांपर्यंत मजल मारू शकला.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला या सामन्यात डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी भक्कम पाया घालून दिला. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 259 धावांची भागीदारी झाली. मिचेल मार्श याने 108 चेंडूत 121 धावा केल्या, तर वॉर्नरने 124 चेंडूत 163 धावांची खेळी केली. दुसरीकडे पाकिस्तानसाठी शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) पाकिस्तानसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शाहीनने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 54 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियन संघाने डावातील 33.5 षटकांमध्ये 259 धावा केल्या होत्या आणि पहिली विकेट गमावली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. शेवटच्या 16-17 षटकांमध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या आठ महत्वपूर्ण खेळाडूंना स्वस्तात बाद केले. शाहीन आफ्रिदीसोबतच हॅरीस रौफ यानेही 3 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. उसमा मीर याला एक विकेट मिळाली.
विश्वचषकातील 18व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: विश्वचषकादरम्यानच भारतीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला टाटा-बायबाय, आता दिसणार नाही…
वाढदिवशी शतक ठोकण्याची डेरिंग करणारे जगातील 6 धुरंधर, यादीत 2 भारतीयांचाही समावेश