वनडे विश्वचषक 2023 रंगात आला आहे. भारतात आयोजित ही क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. यजमान भारत आणि न्यूझीलंड यांनी विश्वचषकातील पहिल्या चार पैकी चारही सामने जिंकले आहेत. मात्र, अशातच एक बातमी शुक्रवारी (20 ऑक्टोबर) समोर आली. भारतीय क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीने विश्वचषक २०२३ दरम्यान निवृत्ती जाहीर केली आहे.
श्रीवत्स गोस्वामी याने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली. श्रीवत्स गोस्वामी याने प्रथम श्रेणी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणारा गोस्वामी 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता.
श्रीवत्स गोस्वामी (Shreevats Goswami) याने ट्विट करत लिहिले की, “मी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. क्रिकेटच्या मैदानावरील हा एक चांगला प्रवास होता आणि प्रवास पूर्ण झाल्याची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे. हा सुंदर खेळ जोपर्यंत मी खेळू शकलो आणि आयपीएल फ्रँचायझींसह अनेक संघांचे प्रतिनिधित्व करणे मला अभिमानास्पद वाटले. माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, बंगाल क्रिकेट, बीसीसीआय आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या संपूर्ण प्रवासात एका भक्कम खांबाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या माझ्या कुटुंबाचा मी ऋणी आहे.”
Thank you . It’s been an absolute pleasure @CabCricket @BCCIdomestic @RCBTweets @rajasthanroyals @SunRisers @KKRiders pic.twitter.com/JyxAV0zY0V
— Shreevats goswami (@shreevats1) October 19, 2023
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये श्रीवत्सने 61 सामन्यांमध्ये 32.46 च्या सरासरीने 3019 धावा केल्या. यामध्ये 4 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए मध्ये त्याने 37.45 च्या सरासरीने 3371 धावा केल्या. ज्यात त्याच्या ६ शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याने प्रथम श्रेणीमध्ये 143 झेल आणि एक स्टंपिंग आणि लिस्ट ए मध्ये 79 झेल घेतले आणि नऊ स्टंपिंग केले आहेत.
श्रीवत्सने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळण्यास सुरुवात केली होती. यानंतर तो मिझोरामला खेळण्यास गेला. तर आयपीएलमध्ये श्रीवत्स कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून खेळला आहे. परंतु त्याला अंतिम अकरामध्ये जास्त संधी मिळाली नाही, त्यामुळे तो जास्त प्रकाश झोतात येऊ शकला नाही. (big news During the World Cup this Indian player hit cricket)
महत्वाच्या बातम्या –
‘आम्ही चुकलो, पण जग संपलं नाही…’, भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानी खेळाडूच्या जिव्हारी
Breaking: 4 आयपीएल ट्रॉफी विजेता मलिंगा पुन्हा मुंबई पलटणच्या ताफ्यात, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी