---Advertisement---

बांगलादेशच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का; ‘या’ संघाने केला एकतर्फी पराभव

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 8:45 PM
---Advertisement---

एकीकडे आयपीएलचा अंतिम टप्पा सुरु असताना दुसरीकडे ओमान येथे टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या बांगलादेश विरुद्ध आयर्लंड या सराव सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या सराव सामन्यात आयर्लंडने बांगलादेशला ३३ धावांनी पराभूत करत खळबळ उडवून दिली. बांगलादेश हा सलग दुसऱ्या सराव सामन्यातील पराभव आहे. यापूर्वी त्यांना श्रीलंकेने पहिल्या सराव सामन्यात पराभूत केलेले.

आयर्लंडची मोठी धावसंख्या
आयर्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गॅरेथ डेलानीच्या ५० चेंडूतील ८८ धावांच्या नाबाद खेळीच्या मदतीने त्यांनी मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार ऍण्डी बालबिर्नीने २२ चेंडूत २५, हॅरी टेक्टरने २३ चेंडूत २३ आणि पॉल स्टर्लिंगने १६ चेंडूत २२ धावांचे योगदान दिले. आयर्लंडने निर्धारित २० षटकात ३ बाद १७७ धावा उभारल्या. बांगलादेशकडून तस्कीन अहमदने दोन आणि नसूम अहमदने एक बळी मिळवला.

बांगलादेशची हाराकिरी
आयर्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ कधीच विजयाच्या मार्गावर दिसला नाही. नुरुल हसनने २४ चेंडूत ३८ आणि सौम्या सरकारने ३० चेंडूत ३७ धावा केल्या. मात्र, ते संघाला एकतर्फी पराभवापासून वाचवू शकले नाही. आयर्लंडकडून मार्क अडायरने तीन, क्रेग यंग आणि जोश लिटलने प्रत्येकी दोन आणि सिमी सिंग आणि बेन व्हाइट यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

बांगलादेशला खेळावी लागणार पात्रता फेरी
टी२० विश्वचषकात बांगलादेशचा पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी गट ब मधील स्कॉटलंडशी आणि १८ ऑक्टोबर रोजी आयर्लंडचा पहिला सामना गट अ मधील नेदरलँडशी होईल. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत आयर्लंड, श्रीलंका, नामिबिया आणि नेदरलँडसह अ गटात आहे. तर, बांगलादेशचा संघ ब गटात स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी आणि ओमानसोबत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---