भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये सध्या तिसरा एकदिवसीय सामना गुरुवारी ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या महिला संघाला धुळ चारत तीन सामन्यांच्या या मालिकेत यजमानांना व्हाईट व्हॉश दिला आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ९ विकेट्स गमावत २५५ धावा रचल्या होत्या. त्याचा पाठलाग करत श्रीलंकेच्या संघाला केवळ २१६ धावांवर समाधान मानावे लागले. आणि भारताला ३९ धावांनी विजय मिळाला.
या सामन्यात श्रीलंकेने नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताची सलामीवर फलंदाज शेफाली वर्माने तुफानी फलंदाजी करत ५० चेंडूत ४९ धावा केल्या. नंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूत ७५ धावा केल्या आणि पूजा वस्त्राकर हिने ६५ चेंडूत ५६ धावा करत भारताला २५५ धावांपर्यंत पोहचवले.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाची सुरुवात अनपेक्षित झाली. केवळ ७ धावांवर भारतीय गोलंदाज मेघना सिंगने श्रीलंकेची सलामीवीर विश्मी गुनारत्ने हिला बाद केले. मात्र, त्यानंतर श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू हिने डाव सावरत ४४ धावांची संयमी खेळी केली. मात्र, तरीही श्रीलंका संघाला पराभव पत्कारावा लागला.
दरम्यान, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विशेष कमाल दाखवली. राजेश्वरी गायकवाड हिने ३ गडी बाद केले. तर पुजा वस्त्राकर हिने फलंदाजीनंतर गोलंदाजीत कमाल दाखवत २ गडी बाद केले. मेघना सिंगने ७ षटकात ३२ धावा देत २ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या गोष्टीचे परिणाम येणाऱ्या काळात जाणवतील’, इंग्लंड दौऱ्याबाबत कर्णधार रोहित शर्माचे मोठे विधान
प्रतिक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना
वाढदिवस विशेष: ‘असा’ पराक्रम करणारा एमएस धोनी आहे केवळ दुसराच यष्टीरक्षक






