भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रत्येकाला हा मोठा सामना पाहायचा आहे पण पावसामुळे या सामन्याची मजा बिघडू शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अहमदाबादचे हवामान सध्या चांगले आहे. परंतु थोडी गरमी आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की 14 ऑक्टोबर रोजी हवामान कसे असेल, कारण या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना रंगणार आहे. या सामन्यात पावसाने येऊन सामन्याची मजा लुटावी असे कोणालाच वाटत नाही.
द टेलिग्राफसह अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये 14 ऑक्टोबर रोजी हलका पाऊस अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्यानुसार शनिवारी उत्तर गुजरात आणि अहमदाबादच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. अहमदाबादच्या हवामान विभागाच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, “अहमदाबाद आणि बनासकांठा, साबरकांठा आणि अरवली सारख्या गुजरातच्या काही उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.”
आशिया कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू असताना पावसामुळे बराच गोंधळ झाला होता. उभय संघांमध्ये 2 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. 10 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता, त्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्येही पाऊस झाला तर चाहत्यांसाठी सामन्याची मजाच बिघडू शकते. (India-Pakistan match rained out, see what the weather will be like in Ahmedabad on October 14)
यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान- बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम उल हक, सौद शकील, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, शादाब खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, हसन अली, मोहम्मद वसीम, शाहीन अफ्रिदी, उस्मान मीर.
महत्वाच्या बातम्या –
IND vs PAK Pitch Report: अहमदाबादमध्ये होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, कुणाला मिळणार खेळपट्टीची साथ?
ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका सामन्यात गोंधळ! मार्कस स्टॉयनिस आणि स्टीव स्मिथच्या विकेटमुळे वाद






