---Advertisement---

रोहित शर्मा ‘हिटमॅन’ नावाला जागला, असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

On: रविवार, ऑक्टोबर 20, 2019 2:58 PM
---Advertisement---

रांची। जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आज द्विशतकी खेळी केली आहे.

कालपासून सुरु झालेल्या या सामन्यात त्याने षटकार ठोकत 250 चेंडूत 28 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 200 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो कसोटीमध्ये षटकार मारत द्विशतक पूर्ण करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी भारताकडून 23 खेळाडूंनी कसोटीत द्विशतकी खेळी केली आहे, पण यातील कोणत्याही भारतीय फलंदाजाला असा पराक्रम करता आला नव्हता.

रांची कसोटीत रोहितने हे द्विशतक पूर्ण केल्यानंतर काहीवेळातच कागिसो रबाडाने त्याला बाद केले. रोहितने 255 चेंडूत 212 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 6 षटकार मारले.

तसेच त्याने अजिंक्य रहाणेबरोबर चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारीही केली आहे. रहाणे 115 धावांवर बाद झाला. भारताने पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---