---Advertisement---

विराट-रोहित नंतर केएल राहुलनेही केला तो खास विक्रम

On: रविवार, जानेवारी 26, 2020 5:36 PM
---Advertisement---

ऑकलँड। आज(26 जानेवारी) भारताने इडन पार्क येथे न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात केएल राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

राहुलने 50 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 57 धावांची खेळी केली. हे त्याचे टी20मधील सलग तिसरे अर्धशतक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये मागील 3 डावात अनुक्रमे 54, 56, 57 धावा केल्या आहेत.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सलग तीन डावात अर्धशतकी खेळी करणारा भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी असा पराक्रम केला आहे.

विशेष म्हणजे विराटने 3 वेळा हा कारनामा केला आहे. तर रोहित आणि राहुलने प्रत्येकी 1 वेळा 3 टी20 डावात अर्धशतके करण्याची कामगिरी केली आहे. विराटने 2012, 2014 आणि 2016 मध्ये अशी कामगिरी केली आहे. तर रोहितने 2018मध्ये हा कारनामा केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सलग डावात अर्धशतके करणारे भारतीय क्रिकेटपटू – 

3 – विराट कोहली (2012)

3 – विराट कोहली (2014)

3 – विराट कोहली (2016)

3 – रोहित शर्मा (2018)

3 – केएल राहुल (2020)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---