सध्या न्यूझीलंडचा कसोटी संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना कराची येथे 26 ते 30 डिसेंबर यादरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यात यजमान संघानेे असे काहीतरी केले जे पूर्ण कसोटी इतिहासात कधीही घडले नव्हते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या सलामीवीरांनी साफ चूकीचा सिद्ध केला आणि पाकिस्तानची मान आंतरराष्ट्रीय सामन्यात शरमेने खाली गेली. या सामन्यात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी पाकिस्तान संघाच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद केली. न्यूझीलंड विरुद्धच्या या कसोटीत पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर यष्टीचीत झाले. ही घटना संपूर्ण कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडली.
चौथ्या षटकात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेल (Ajaz Patel) याने पाकिस्तान संघाला पहिला झटका दिला. न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आपले फिरकी आक्रमण सुरुवातीपासून चालू केले. किवी संघाच्या फिरकीच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी पुढे येऊन बचावात्मक शॉट खेळण्याची रणनीती अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) याने बनवली, पण या योजनेत तो अयशस्वी झाला आणि यष्टीचीत होऊन तंबूत परतला. त्यानंतर अशाच पद्धतीने शान मसूद (Shan Massod) देखील ब्रेसवेल याच्या चेंडूवर यष्टीचीत झाला. या दोन विकेटमुळे पाकिस्तानच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. पहिले दोन फलंदाज यष्टीचीत होऊन बाद होण्याची ही घटना संपूर्ण कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडली.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या संघामध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिले दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने डाव सांभाळला. त्याला दुसऱ्या फलंदाजांनीही उत्तम साथ दिली. 58 षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या 4 बाद 224 अशी होती. कर्णधार बाबर आझम याने झंझावती शतक झळकावत पाकिस्तान संघाला सुस्थितीत आणले. त्याला सरफराज अहमद (Sarfaraj Ahmed) यानेही नाबाद 46 धावा करत सुरेख साथ दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयला जोर का झटका! आयपीएल 2023 च्या धमाकेदार आयोजनावर आयसीसीने फेरले पाणी
हौशी टेनिस लीग स्पर्धेत टेनिस नट्स राफा, पीसीएलटीए उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश






