भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्वचषक 2019 च्या तयारीत आहे. पण या विश्वचषकात भारताकडून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न कायम आहे. भारतीय निवड समीतीने यासाठी अष्टपैलू विजय शंकरचा पर्याय समोर ठेवला आहे. या पर्यायाला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सहमती दर्शवली आहे.
त्यांच्या मते भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी विजय शंकर चांगला पर्याय आहे . त्याचबरोबर सलामीचा फलंदाज केएल राहुल पण चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सक्षम पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कपिल देव म्हणाले की ‘या टी-20 क्रिकेटच्या काळात फलंदाजीचा क्रम आता स्थायी राहिलेला नाही. कोणत्याही फलंदाजाला कोणत्याही क्रमांकावर खेळवला जाऊ शकतो. गेल्या दहा वर्षात क्रिकेटचा स्तर खूप बदलला गेला आहे.’
‘आता हे सांगणे पण खूप कठिण झाले आहे की कोण चांगला सलामीवीर आणि कोण चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकेल.’
कपिल देव पुढे म्हणाले, ‘या दिवसात अशी मानसिकता आहे की कोणालाही कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते.’
‘विश्वचषक 2011 आठवा, जेव्हा एमएस धोनी मुंबई येथे (वानखेङे स्टेडीयम) झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंके विरुद्ध फलंदाजीत बदल करुन युवराज सिंगच्या अगोदर फलंदाजीसाठी आला होता. तेव्हा धोनीने भारताच्या विजयात (नाबाद 91धावा) महत्वाची भूमिका बजावली होती.’
2019 विश्वचषकाचा दावेदार कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना कपिल देव म्हणाले की ‘सर्व संघ चांगले खेळत आहेत. पण भारत, ऑस्टेलिया आणि इंग्लंड सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्या व्यतिरिक्त चौथा संघ न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्टइंडीजमधील एक असू शकतो.’
त्याचबरोबर पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक पांड्या दुसरा कपिल देव आहे का, असा प्रश्न विचारल्यावर कपिल म्हणाले. ‘त्याच्यावर कोणताही दबाव नाही आला पाहीजे. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू दिला पाहिजे. कोणाची तुलना कोणाशी करणे हे मला अजिबात पसंत नाही.’
आयसीसी विश्वचषक 2019 स्पर्धा 30 मे ते 14 जुलै या काळात इंग्लंड आणि वेल्स येथे होणार आहे. .या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे.
विश्वचषकासाठी असा आहे 15 सदस्यीय भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी(यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रविंद्र जङेजा आणि मोहम्मद शमी.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रिषभ पंतने पॉवरफुल षटकार मारण्यामागील कारणाचा केला खूलासा
–पंतने केला आपल्याच कर्णधाराला विरोध, श्रेयस अय्यरला बदलावा लागला निर्णय, पहा व्हिडिओ
–तीन वर्षांनंतर फलंदाजही तोच, गोलंदाजही तोच आणि निकालही सारखाच…





