विशाखापट्टणम। बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात आयपीएल 2019मधील एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने 2 विकेट्सने विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे.
दिल्लीच्या या विजयात रिषभ पंतने 21 चेंडूत आक्रमक 49 धावांची खेळी करत मोलाचा वाटा उचलला. या खेळीत पंतने 2 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
या सामन्यानंतर मोठे षटकार मारण्याच्या क्षमतेबद्दल बोलताना रिषभ म्हणाला, ‘टी20 मध्ये तूम्हाला 20 चेंडूत 40 असे काहीतरी हवे असते. त्यामुळे तूम्ही एका गोलंदाजावर आक्रमण करता. मी कोण गोलंदाजी करत आहे हे पाहत नाही. हे आमच्या सवयींमध्ये सामील झाले आहे आणि त्यामुळे आम्ही इतका सराव करत असतो.’
‘आजची खेळी खास होती. कारण मी फक्त चेंडू फटकावण्याचा प्रयत्न करत नव्हतो. मी चेंडू पाहून वेळेवर हिट मारण्याचा प्रयत्न करत होतो.’
पंतने त्याच्या खेळीने दिल्लीला विजयाच्या समीप पोहचवले होते. पण 8 चेंडूत दिल्लीला 5 धावांची गरज असताना पंत बाद झाला. त्याने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मोहम्मद नबीकडे झेल दिला. पण पंतने या सामन्यानंतर पुढचा सामना संपवुनच जाईल अशी इच्छा व्यक्त केली आहे.
पंत म्हणाला, ‘जर तूम्ही अशा खेळपट्टीवर स्थिर झाला असाल, तर तूम्ही तूमच्या संघासाठी सामना संपवायला हवा होता. मी खूप जवळ पोहचलो होतो. पण पुढच्या सामन्यात मी संघासाठी सामना संपवेल. मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. जर तूमची मनस्थिती नकारात्मक असेल तर त्याची मदत होत नाही.’
या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या हैद्राबादला 20 षटकात 8 बाद 162 धावा करता आल्या. तर दिल्लीने 163 धावांचे आव्हान 19.5 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
क्वालिफायर 2 च्या सामन्यात दिल्ली 10 मे ला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 12 मे ला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पंतने केला आपल्याच कर्णधाराला विरोध, श्रेयस अय्यरला बदलावा लागला निर्णय, पहा व्हिडिओ
–तीन वर्षांनंतर फलंदाजही तोच, गोलंदाजही तोच आणि निकालही सारखाच…
–गमतीशीर! श्रेयस अय्यरने नाणेफेकीवेळी केली मजेदार चूक, पहा व्हिडिओ