विशाखापट्टणम। बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात आयपीएल 2019मधील एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने 2 विकेट्सने विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. मात्र या पराभवामुळे हैद्राबादचे आयपीएल 2019 मधील आव्हान संपुष्टात आले आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पण यावेळी त्याने हे नाणेफेक जिंकण्याआधी एक मजेशीर गोष्ट पहायला मिळाली. ज्यामुळे नाणेफेकीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच हसू आले.
झाले असे की नाणेफेकीवेळी निवेदक संजय मांजरेकर कर्णधारांची ओळख करुन देत होते. पण त्याचवेळी अय्यरने नाणेफेकीचे नाणे उडवले. त्यावर लगेचच मांजरेकर ‘थांब थांब’, असे म्हणाले आणि लगेचच ते नाणे झेलण्यासाठी त्यांनी एक हात वर केला.
यावेळी हैद्राबादचा कर्णधार केन विलियमसनने आणि अय्यरनेही ते नाणे झेलण्याचा प्रयत्न केला. अखेर विलियमसनने नाणे पकडत ते पुन्हा श्रेयसला दिले.
यावेळी मांजरेकर हसत श्रेयसला म्हणाले, ‘मला माझे बोलणे पूर्ण करु दे, तूला सामन्याची सुरवात करण्याची घाई झालेली आहे.’ यावर तिथे उपस्थित असणाऱ्या सामनाधिराऱ्यांसह अय्यर आणि विलियमसनलाही हसू आले.
यानंतर अखेर मांजरेकरांचे बोलणे झाल्यावर अय्यरने पुन्हा नाणे उडवले. यावेळी विलियमसनने ‘टेल्स’ असा कॉल दिला पण नाण्याने अय्यरच्या बाजूने कौल दिला.
हा गमतीशीर व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच याला कॅप्शन दिले आहे की ‘इथे वायझॅकमध्ये(विशाखापट्टणम) कर्णधार अय्यरला सुरवात करण्याची घाई झाली आहे.’
Skipper Iyer eager to get things started here in Vizag ???????? pic.twitter.com/2EwJGEuFLh
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2019
या सामन्यात अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेल्या हैद्राबादला 20 षटकात 8 बाद 162 धावा करता आल्या. हैद्राबादकडून मार्टिन गप्टिलने सर्वाधिक 36 धावा केल्या. तसेच गोलंदाजीत दिल्लीकडून किमो पॉलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इशांत शर्माने 2 आणि ट्रेंट बोल्ट, अमित मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यांनंतर 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीकडून पृथ्वी शॉने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने 21 चेंडूत आक्रमक 49 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 19.5 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 163 धावांचे आव्हान पूर्ण केले.
गोलंदाजीत हैद्राबादकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि राशिद खानने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर दिपक हुडाने 1 विकेट घेतली.
Toss with a difference tonight. Do watch.????https://t.co/ZMuVoXozr1
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) May 8, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०१९ विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना १५ दिवसांसाठी मिळू शकते पत्नीची सोबत
–आयपीएलच्या इतिहासात असा बाद होणारा अमित मिश्रा दुसराच खेळाडू, पहा व्हिडिओ
–आयपीएलमध्ये संधी न मिळालेला चेतेश्वर पुजारा आता खेळणार या लीगमध्ये





