---Advertisement---

आयपीएलमध्ये संधी न मिळालेला चेतेश्वर पुजारा आता खेळणार या लीगमध्ये

On: बुधवार, मे 8, 2019 7:45 PM
---Advertisement---

भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा 14 मेपासून सुरु होणाऱ्या सौराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सामील होणार आहे. याबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बुधवारी(8 मे) प्रसिद्धी पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘पहिल्या सौराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 5 संघ सहभागी होणार आहेत. हे संघ आता चेतेश्वर पुजाराची निवड करु शकतात. कारण तो सौराष्ट्र प्रीमियर लीगसाठी उपलब्ध असणार आहे.’

‘पुजारा पाच संघांपैकी कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करेल याचा अंतिम निर्णय उद्या (9 मे) घेतला जाणार आहे. यावेळी सर्व 5 सहभागी संघाचे मालक आणि प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.’

‘अखेर चेतेश्वरला इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये केलेल्या करारातून वेळ मिळाल्याने तो  सौराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे सर्वजण आनंदी आहेत’

पुजाराने आत्तापर्यंत 64 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 29.47 च्या सरासरीने 1356 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.

पहिल्या सौराष्ट्र प्रीमीयर लीगमध्ये सोरथ लायन्स, गोहिलवाड ग्लाडिएटर्स, हालर हिरोज, जलावद रॉयल्स, कछ वॉरियर्स हे पाच संघ सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: एकाच चेंडूवर बॅटही निसटली, शानदार झेलही पकडला पण तरीही वाचली धोनीची विकेट

रोहित शर्माने ‘त्या’ खेळाडूला खेळावण्यामागील स्पष्ट केले कारण

असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या अंतिम सामन्यातील इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment