---Advertisement---

Video: एकाच चेंडूवर बॅटही निसटली, शानदार झेलही पकडला पण तरीही वाचली धोनीची विकेट

On: बुधवार, मे 8, 2019 7:07 PM
---Advertisement---

चेन्नई। मंगळवारी(7 मे) एमए चिंदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2019 मधील क्वालिफायर 1 चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने 6 विकेट्सने विजय मिळवून पाचव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली.

या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 131 धावा करता आल्या. यामध्ये चेन्नईची 4 बाद 65 अशी अवस्था असताना अंबाती रायडू आणि एमएस धोनीने नाबाद 66 धावांची भागीदारी करत चेन्नईला समाधानकारक धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला. रायडूने नाबाद 42 तर धोनीने नाबाद 37 धावांची खेळी केली.

विशेष म्हणजे धोनीला शेवटच्या षटकात एक जीवदान मिळाले. पण यावेळी एक विचित्र गोष्टही पहायला मिळाली. झाले असे की चेन्नईचा संघ फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी टाकत होता. त्यावेळी धोनी फलंदाजी करत होता.

या षटकात बुमराहने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर धोनीने लाँग ऑनला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याच्या हातातून बॅटची पकड निसटली आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गेला. यावेळी इशान किशनने उडी मारत तो चेंडू झेलला. त्यामुऴे असे वाटले की धोनी बाद झाला. परंतू नंतर पंचांनी नो बॉल तपासल्यावर व्हिडिओ रिप्लेमध्ये दिसले की तो नो-बॉल होता.

यामुळे धोनीला जीवदान मिळाले. पण तरीही या षटकात धोनी आणि रायडूला केवळ 9 धावा करण्यातच यश आले. त्यामुळे चेन्नई मुंबईसमोर विजयासाठी केवळ 132 धावांचे आव्हान ठेऊ शकली.

मुंबईने हे आव्हान 18.3 षटकात सुर्यकुमार यादवने केलेल्या नाबाद 71 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पार केले.

या सामन्यात गोलंदाजीमध्ये चेन्नईकडून इम्रान ताहिरने सर्वाधिक 2, तर दिपक चहर आणि हरभजन सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तसेच मुंबईकडून राहुल चहरने सर्वाधिक 2 आणि कृणाल पंड्या आणि जयंत यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माने ‘त्या’ खेळाडूला खेळावण्यामागील स्पष्ट केले कारण

असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या अंतिम सामन्यातील इतिहास

एमएस धोनीने सांगितले मुंबई विरुद्ध झालेल्या पराभवाचे कारण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment