---Advertisement---

रोहित शर्माने ‘त्या’ खेळाडूला खेळावण्यामागील स्पष्ट केले कारण

On: बुधवार, मे 8, 2019 4:51 PM
---Advertisement---

मंगळवारी(7 मे) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानात 6 विकेट्सने हरवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या मोसमात अंतिम सामन्यात प्रवेश करणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे.

या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की त्याला त्याच्या खेऴाडूंवर विश्वास होता. या सामन्यात मुंबईने जयंत यादवला अंतिम 11 जणांच्या संघात संधी दिली होती. त्यानेही मुंबईकडून चांगली कामगिरी करताना सुरेश रैनाला बाद केले. त्याला मुंबईच्या संघात खेऴवण्यामागचेही कारण रोहीतने सामन्यानंतर स्पष्ट केले आहे.

सामना संपल्यानंतर रोहीत म्हणाला की ‘हे चांगले प्रयत्न होते. तसेच आम्ही अंतिम सामन्यात पोहचल्याचे बघुन मला खूप आनंद झाला आहे.’

जयंत यादवला अंतिम 11 मध्ये स्थान देण्याच्या निर्णयाबद्दल रोहित म्हणाला ‘ आम्ही हा निर्णय घेतला कारण चेन्नईच्या संघात काही उजव्या हाताचे फलंदाज आहेत. जयंत हा चांगला गोलंदाज आहे.’

‘तसेच त्याला संधी देण्यामागील कारण असे की या पिचवर एका रिस्ट स्पिनरच्या(मनगटाचा वापर करणारे फिरकीपटू) ऐवजी फिंगर स्पिनर (बोटाचा वापर करणारे फिरकीपटू) प्रभावी होते. आम्हाला माहित होते धोनीची खेळी शेवच्या षटकात महत्त्वाची असणार. त्यासाठी आम्ही योजना आखल्या होत्या. चेन्नईला 140 च्या आत रोखणे ही चांगली गोष्ट होती. योजना योग्य रितीने आमलात आणण्याचे श्रेय गोलंदाजांचे आहे.’

याबरोबरच रोहितने या सामन्यामध्ये नाबाद 71 धावांची खेळी करणाऱ्या सुर्यकुमारचेही कौतुक केले आहे.

रोहित म्हणाला, ‘सुर्यकुमार हा आमचा फिरकी गोलंदाजी खेळणारा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आम्हाला माहीत होत की फिरकी गोलंदाजी एक मोठा अडथळा असणार आहे. मी सूर्यकुमारला जवळून खेळताना पाहिलं होतं. त्याने विकेटच्या मागून खेळलेले फटके सोपे नव्हते. मला नेहमी वाटत होते तो एका स्तराला चांगला खेळेल.’

मुंबईने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत चेन्नईला 131 धावांवर रोखलं आणि 132 धावांचे आव्हान मुंबईने 18.3 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. या मोसमात मुंबई व चेन्नई 3 वेऴा आमने सामने आले होते. या तीनही वेळा मुंबईने चन्नईला धूऴ चारली आहे.

आता आयपीएल 2019मध्ये आज(8मे) एलिमिनेटरचा सामना दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये 10 तारखेला चेन्नई विरुद्ध खेळेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचे आयपीएल 2019 मधील आव्हान संपुष्टात येईल. आयपीएल 2019 मधील अंतिम सामना 12 मे ला हैद्राबाद येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या अंतिम सामन्यातील इतिहास

एमएस धोनीने सांगितले मुंबई विरुद्ध झालेल्या पराभवाचे कारण…

विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, हा वेगवान गोलंदाज संघातून बाहेर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment