---Advertisement---

२०१९ विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना १५ दिवसांसाठी मिळू शकते पत्नीची सोबत

On: गुरूवार, मे 9, 2019 2:57 PM
---Advertisement---

मागील काही महिन्यांपासून परदेश दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटूंनी पत्नीला सोबत घेऊन जाण्याबद्दल अनेक चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) 2019 विश्वचषकादरम्यान 15 दिवसांसाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नींना किंवा कुटुंबियांना सोबत राहण्याची परवानगी दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 2019 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या तीन आठवड्यांनंतर क्रिकेटपटूंना आणि सपोर्ट स्टाफला त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबिय 15 दिवसांसाठी सोबत करु शकतात.

त्यामुळे या वृत्ताप्रमाणे 16 जूनला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी किंवा कुटुंबिय उपस्थित राहू शकणार नाही.

याबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला एका सुत्राने सांगितले, ‘जर कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला विश्वचषकाच्या शेवटपर्यंत सोबत रहायचे असेल तर तिला त्याप्रमाणे योजना आखाव्या लागतील जेणेकरुन 15 दिवसांचा कालावधी बाद फेरीच्या दरम्यान येईल.’

2019 मधील विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलच्या इतिहासात असा बाद होणारा अमित मिश्रा दुसराच खेळाडू, पहा व्हिडिओ

आयपीएलमध्ये संधी न मिळालेला चेतेश्वर पुजारा आता खेळणार या लीगमध्ये

Video: एकाच चेंडूवर बॅटही निसटली, शानदार झेलही पकडला पण तरीही वाचली धोनीची विकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment