23 जानेवारीपासून भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी ऑकलंडला पोहचला आहे. या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी२० सामन्यांच्या मालिका होणार आहेत. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला या दौऱ्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.
न्यूझीलंडमध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या सचिनच्या नावावर आहे. त्याने 22 वनडे सामन्यात 39.9 च्या सरासरीने 821 धावा केल्या आहेत.
या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने न्यूझीलंडमध्ये वनडेत 12 सामन्यात 90.16 च्या सरासरीने 541 धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीला या यादीत अव्वल क्रमांकावर येण्यासाठी 280 धावांची गरज आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे. त्याने 12 सामन्यात 54.36 च्या सरासरीने 598 धावा केल्या आहेत.
धोनीसाठी 2018 हे वर्षे जरी खराब ठरले असले तरी त्याची 2019 या वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके करत मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता. या मालिकेत त्याने भारताकडून सर्वाधिक 193 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक
–Video: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…
–ऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का