क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणतात. तसेच हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असेही म्हटले जाते. या खेळात कधी काय घडेल हे आपण कधीच सांगू शकत नाही. कधीकधी संघ जिंकलेला सामना गमावतात आणि गमावलेला सामना देखील जिंकतात. क्रिकेटमध्ये गोलंदाजांची भूमिका खूप महत्वाची आहे. विकेट घेण्याचे आणि धावा न देण्याचे आव्हान गोलंदाजांना असते पण अतिरिक्त धावा न देण्याचा दबावही गोलंदाजांवर असते. नो बॉल किंवा वाईड बॉलने फलंदाजी करणाऱ्या संघाला ना फक्त एक अतिरिक्त धावा मिळते शिवाय अतिरिक्त चेंडूही खेळण्यास मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे काय की क्रिकेट इतिहासात असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत एकही वाईड बॉल टाकला नाही आहे, चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.
रिचर्ड हेडली (न्यूझीलंड)
या यादीमध्ये न्यूझीलंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सर रिचर्ड हेडली यांचेही नाव आहे. त्यांना क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान अष्टपैलू खेळाडू मानले जाते. १७ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ८६ कसोटी सामने खेळले व ४३१ विकेट घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी ११५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी १५८ विकेट्स घेतल्या आहेत. पण एवढ्या कारकिर्दीत त्यांनी वाईड बॉल टाकलेला नाही.
लान्स गिब्स (वेस्ट इंडीज)
लान्स गिब्स हे कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक मानले जातात . ते त्या काही गोलंदाजाने पैकी एक होते, ज्यांचा इकॉनॉमी रेट हा प्रतिषटके २ धावांपेक्षा खाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणारे ते पहिले फिरकीपटू होते. त्यांनी वेस्ट इंडिजसाठी ३ एक दिवसीय व ७९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी कधीही वाईड बॉल टाकला नाही.
क्लेरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया)
क्लेरी ग्रिमेट हे एक जबरदस्त फिरकी गोलंदाज होते. त्यांना फ्लिपरचा पिता म्हटले गेले. ग्रिमेट यांना प्रथम वेगवान गोलंदाज बनण्याची इच्छा होती पण आपल्या शाळेच्या साथीदाराच्या सल्ल्यानुसार तो फिरकी गोलंदाजीकडे वळले. वयाच्या 17 व्या वर्षी वेलिंग्टनकडून त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी न्यूझीलंड हे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळात नव्हते. त्यामुळे ते १९१४ मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ३७ कसोटी सामने खेळले आहेत, त्यात त्यांनी २१६ विकेट्स घेतल्या आहे. त्यांनी एकही वाईड बॉल टाकला नाही.
डेरेक अंडरवुड (इंग्लंड)
डेरेक अंडरवुड हे एक चांगले फिरकीपटू होते. त्यांचा इनस्विंग फलंदाजांना पायचीत करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यांची गोलंदाजीची टप्पा आणि दिशा एवढा चांगला होता की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीच वाईड बॉल टाकला नाही. १९६९ ते १९७३ दरम्यान ते अव्वल क्रमांकाचे गोलंदाज होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ८६ कसोटी तर २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
गॅरी सोबर्स (वेस्ट इंडीज)
सर गारफिल्ड सोबर्स हे वेस्ट इंडीजचे महान अष्टपैलू खेळाडू आहेत. एकेकाळी डॉन ब्रॅडमनने सोबर्सला “फाईव्ह इन वन क्रिकेटर” म्हणून संबोधले होते. फलंदाजी आणि गोलंदाजी व्यतिरिक्त ते यष्टीरक्षण देखील करत असे. त्यांनी आपल्या कारकीर्दीतमध्ये ९३ कसोटी आणि एक मात्र एकदिवसीय सामना खेळला आहे. त्यात त्यांनी २०६६० चेंडू टाकले, पण एकही वाईड टाकला नाही.
इमरान खान (पाकिस्तान)
या यादीत पाकिस्तानचा विश्वचषक जिंकणारा कर्णधार इम्रान खान याचेही नाव आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत 88 कसोटी आणि 175 एकदिवसीय सामने खेळले. या दरम्यान त्याने ३६२ विकेट्स कसोटीत आणि १८२ विकेट्स एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत घेतले आहेत. इम्रान खान देखील अशा गोलंदाजांपैकी आहे, ज्यांनी आपल्या कारकीर्दीत कधीही वाईड बॉल टाकला नाही.
इयान बॉथम (इंग्लंड)
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बॉथम हे क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू मानले जातात. १९८० च्या दरम्यान बॉथम कसोटी सामन्यात १० बळी आणि शतक ठोकणारे बॉथम पहिले खेळाडू होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत १०२ कसोटी आणि ११६ एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ३८३ कसोटी विकेट्स आणि १४५ विकेट्स एकदिवसीय कारकिर्दीत घेतले आहेत. इतकी लांब कारकीर्द असूनही बॉथम यांनी कधीही वाईड बॉल टाकला नाही.
डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया)
डेनिस लिली क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जातात. १९८४ मध्ये जेव्हा त्यांनी निवृत्ती घेतली तेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्याकडे होता. लिली यांनी त्यांच्या १३ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ७० कसोटी आणि ६३ एकदिवसीय सामने खेळले. यावेळी त्यांनी ३५५ विकेट्स कसोटीमध्ये आणि १०३ विकेट्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतले होते आणि कधीही वाईड बॉल टाकला नव्हता.
बॉब विलिस (इंग्लंड)
बॉब विलिसने १९७१ ते १९८४ पर्यंत इंग्लंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. १९८१ च्या अॅशेस मालिकेमध्ये त्यांनी फक्त ४३ धावा दिल्या आणि ८ विकेट्स घेऊन जवळजवळ पराभावाच्या गर्तेत अडकलेल्या इंग्लंडला बाहेर काढत विजय मिळवून दिला होता. त्यांनी ९० कसोटी सामने खेळले आणि त्यात ३२५ विकेट्स घेतले आहेत. या काळात त्यांनी कधीच वाईड बॉल टाकले नाही.
फ्रेड ट्रूमन (इंग्लंड)
साल १९४८ पासून दोन दशकांहून अधिक काळ फ्रेड ट्रुमन यांनी इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. ते क्रिकेट इतिहासाच्या महान गोलंदाजांमध्ये गणले जातात. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ६७ कसोटी सामने खेळले आणि ३०७ बळी घेतले. कारकिर्दीत त्यांनी कधीही वाईड बॉल टाकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
ताबडतोड फलंदाजी! वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारे ३ भारतीय क्रिकेटर
वनडेत एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारे तीन भारतीय, एक तर आहे दिग्गज गोलंदाज
‘त्या’ चेंडूनंतर पृथ्वी शॉने ठरवले एका षटकात ६ चौकार मारायचे