2 नोव्हेंबर, 1981 मध्ये टाऊन्सविले, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनचा (Mitchell Johnson) जन्म झाला. त्याचा आज 40 वा वाढदिवस आहे. त्याने वयाच्या 17व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
जॉन्सनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 73 कसोटी सामन्यात 313 विकेट्स घेतल्या. तसेच वनडेमध्ये त्याने 153 सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आणि 30 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 38 विकेट्स घेतल्या.
या आहेत जॉन्सनबद्दलच्या 10 गोष्टी
– ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज म्हणून नाव मिळवलेल्या जॉन्सनमधील प्रतिभा ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज डेनिस लीली यांनी ओळखली. त्यांनी जॉन्सनची ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट ऍकॅडमीसाठी निवड केली.
जॉन्सनचे लीली यांच्याबरोबर नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. 2007मध्ये त्याने लिलींबरोबर चेन्नईमधील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये काम केले. तसेच 2013-14 च्या ऍशेस मालिकेतही लीली यांनी जॉन्सनबरोबर उत्तम काम केले. या मालिकेतून जॉन्सनने क्रिकेटमध्ये उल्लेखनीय पुनरागमन केले होते. या ऍशेस मालिकेत त्याने 5 सामन्यात 37 विकेट्स घेतल्या होत्या.
Happy birthday Mitchell Johnson! 🎂
He was the quickest bowler to 150 Test wickets and finished his career with 313 of them 👏 pic.twitter.com/5W86lYi8hl
— ICC (@ICC) November 2, 2019
-2000च्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषकात जॉन्सनने ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी शेन वॉट्सन, नॅथन हॉरिट्ज, मायकल क्लार्क, एड कोवान, शॉन मार्श आणि अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे खेळाडू त्याचे संघसहकारी होते. तसेच जॉन्सनने19 वर्षाखालील ऑस्ट्रेलिया संघाकडून 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे सामनेदेखील खेळले आहेत.
-त्याच्या कारकीर्दीतील सुरुवातीच्या काही वर्षात त्याला दुखापतींनी अस्वस्थ केले. परिणामी, क्वीन्सलँडच्या कराराच्या यादीतून त्याला बाहेर जावे लागले आणि त्याला प्लंबिंग व्हॅन चालवण्यास भाग पडले. तेव्हा तो ब्रिसबेनमध्ये फलंदाज म्हणून क्लब क्रिकेट खेळत होता.
– ग्लेन मॅकग्रा निवृत्त झाल्यानंतर जॉन्सनने नोव्हेंबर 2007 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा जॉन्सन हा 398वा खेळाडू ठरला. कसोटी पदार्पणाची कॅप जॉन्सनला मॅकग्राने दिली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या.
-2009 चा आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जॉन्सनला मिळाला. त्याबद्दल त्याला ‘सर गारफिल्ड सोबर्स’ ट्रॉफीने पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार पटकावणारा तो रिकी पाँटिंग नंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू होता.
-जॉन्सन हा जगातील सर्वात घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथला जॉन्सनच्या गोलंदाजीमुळे दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. 2009 मध्ये जॉन्सनकडून स्मिथच्या हाताला दोन वेळा दुखापत झाली. त्याचवर्षी, जॉन्सनचा चेंडू जॅक कॅलिसच्या तोंडाला लागून त्याचा जबड्याला दुखापत झाली होती.
2014मध्ये कसोटी सामन्यादरम्यान जॉन्सनचा चेंडू रायन मॅकलॅरेनच्या डोक्याला लागला होता. तर त्यानंतर जॉन्सनकडून मॅकलॅरेनच्या हातावर चेंडू लागला. त्यामुळे मॅकलॅरेनला छोटे फ्रॅक्चर झाले होते.
-वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज ब्रेंडन नॅश आणि जॉन्सन हे त्यांच्या किशोरवयीन काळात एकाच खोलीत राहत होते. योगायोगाने या दोघांनाही एकाचवर्षी त्यांचे राज्य करार गमावले लागले होते.
पुढे जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळला आणि नॅश हा जमैकाला स्थलांतरित झाला. पुढे नॅश वेस्ट इंडिजकडून तर जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाकडून एकमेकांविरोधात क्रिकेट खेळले.
-2013-14 च्या ऍशेस पूर्वी, जॉन्सनने इंग्लंडविरुद्ध संमिश्र यश मिळवले होते. इंग्लंडमधील लोकप्रिय असलेला चाहत्यांच्या ग्रुप- ‘बार्मी आर्मी’ ने जाॅन्सनला उद्देशून एक गाणेही लिहिले होते.
-2013-14 च्या ऍशेस दरम्यान जाॅन्सनच्या ‘हँडलबार’ सारख्या मिश्या चर्चेचा विषय बनली होती. त्याने मुव्हेंबरला पाठिंबा देण्यासाठी या मिशा वाढवल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात दाढी-मिशा वाढवल्या जातात. कर्करोग आणि पुरूषांच्या इतर शारिरीक समस्यांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो.
-जॉन्सनने 2011 मध्ये जेसिका ब्रॅटिशबरोबर लग्न केले. जेसिकाने कराटे मध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ पटकाविला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Video: …आणि इथेच सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले, सीमारेषेजवळील तो अद्भुत कॅच
मॉर्गनचा विश्वविक्रम! ‘कॅप्टनकूल’ धोनीला मागे टाकत ठरला आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात यशस्वी कर्णधार