---Advertisement---

‘दीवाली हो या होली, अनुष्का लव कोहली’ चाहत्यांने केली मजेशीर घोषणाबाजी, पाहा विराटची प्रतिक्रिया!

---Advertisement---

विराट कोहलीचे भारतासह विदेशातही खूप चाहते आहेत. विराटची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहते तासंतास त्याची वाट पाहत असतात, आणि त्याच्यासोबत मजा करण्याच्या मूड मध्ये देेखील असतात. याचाच प्रत्यय काल 12 जून रोजी झालेल्या भारत अमेरिका सामन्यात पहायला मिळाला. टीम इंडियाने हा सामना जिंकून सुपर-8 साठी पात्र ठरला. सामन्या दरम्यान स्टेडियम मधील चाहत्यांनी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्याशी संबंधित मजेशीर घोषणाबाजी सुरु केली.

भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणा दरम्यान विराट कोहली चाैकारावर थांबला होता. तेव्हा स्टँडमधील चाहते कोहलीला पाहून उत्साही झाल्या, आणि यानंतर चाहत्यांनी त्याला पाहून मजेशीर घोषणा देण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी नारा दिला – “दस रुपये की पेप्सी, कोहली भाई सेक्सी”. त्यानंतर चाहत्यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याशी संबंधित एक मजेदार घोषणाबाजी केली – “दीवाली हो या होली, अनुष्का लव कोहली” या घोषणांवर कोहलीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तो क्षेत्ररक्षणावर ध्यान केद्रिंत केले. पण ही मजेशीर घोषणा ऐकायला छान वाटत होत्या, ज्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

टी20 विश्वचषकात कोहली प्रथमच गोल्डन डक वर बाद झाला आहे. सामन्यात सालामीसाठी आलेली कोहली साैरभ नेत्रावळकरच्या पहिल्याच चेंडूवर विकेटकीपरच्या हाती झेल देत बाद झाला. यंदाच्या विश्वचषकात कोहली बॅट शांत राहिली आहे. मागील दोन्ही सामन्यात तो स्वस्तात आउट झाला आहे.

विराट कोहली टी20 विश्वचषकात 2012 मध्ये पदार्पण केले होते, विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 28 डाव खेळला आहे. ज्यामध्ये 130.52 च्या स्ट्रईक रेटने 1146 धावा केल्या आहेत. विराट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादी मध्ये अव्वल स्थानी आहे. या सोबतच कोहली टी20 विश्वचषकात दोनदा मालिकावीरचा पुरस्कार जिंकला आहे. त्याने 2014 आणि 2016 मध्ये ही कामगिरी केली होती.

महत्तवाच्या बातम्या-

आयसीसीचा ‘स्टॉप क्लॉक’ नियम काय आहे? ज्यामुळे भारताला 5 धावा फुकट मिळाल्या, जाणून घ्या
कॅरेबियन पाॅवर जोमात, केन विल्यमसन कोमात! वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडला दे धक्का
भारताच्या विजयाचा पाकिस्तानला फायदा! सुपर-8 चं समीकरण बनलं आणखी रोमांचक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---