ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्स याची आज (०९ जून) ४७वी जयंती आहे. ९ जून, १९७५ रोजी युकेमध्ये जन्मलेला सायमंड्स हा २०००च्या दशकातील ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता. तो त्याच्या क्रिकेट कारकीर्दीसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत राहिला. चला तर त्याच्याविषयी माहिती नसलेल्या १० गोष्टींवर नजर टाकूया…
एँड्र्यू सायमंड्स याच्याबद्दल माहिती नसलेल्या १० गोष्टी
१. पश्चिम भारतीय वारसा
एँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) हा कॅरिबियनमध्ये त्याची मुळे शोधायचा. तो लहान असताना त्याला एका इंग्रजी जोडप्याने दत्तक घेतले होते. त्यानंतर तो त्याच्या तरुणपणी ऑस्ट्रेलियाला गेला. मात्र, इंग्लंडमध्ये जन्म घेतल्याचा अर्थ त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट होता.
२. स्वत:च्या देशाविरुद्ध ठोकलेले शतक
सायमंड्सने १९९४-९५च्या हंगामात क्वीन्सलँडकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद १०८ धावा केल्या होत्या, जे त्याचे पहिले प्रथम श्रेणी शतक होते. त्याचे भविष्यातील ऑस्ट्रेलियाचे सहकारी, मॅथ्यू हेडन आणि जिमी माहेर यांनीही त्या सामन्यात शतके ठोकली होती.
३. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये षटकारांचा विक्रम
सायमंड्सने १९९४मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु पुढील वर्षी ग्लुसेस्टरशायरसाठी खेळताना त्याने इंग्लंडमध्ये आपली दूर दूरपर्यंत छाप पाडली. नाबाद २५४ धावांच्या वादळी खेळीदरम्यान, सायमंड्सने १६ षटकार ठोकले होते, जो जवळपास २० वर्षे प्रथम श्रेणीच्या डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम राहिला. २०१०मध्ये जेसी रायडर, ग्रॅहम नेपियर आणि मुक्तार अली यांनी या विक्रमाची बरोबरी केली होती. तरीही मार्च २०१५मध्ये ऑकलंड आणि सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स यांच्यातील सामन्यात २३ षटकार ठोकणाऱ्या न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने हा विक्रम मोडीत काढला.
४. इंग्लंडकडून बोलावणं आणि कठीण निर्णय
सायमंड्सच्या ब्रिटीश पासपोर्टमुळे आणि अर्थातच त्याच्या पहिल्या हंगामात बॅटने केलेल्या कारनाम्यांमुळे, सायमंड्सला १९९५च्या उत्तरार्धात रे इलिंगवर्थने इंग्लंड अ संघासाठी निवडले होते. अशा चर्चा होत्या की, तो १९९४मध्ये १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघासाठीसाठी खेळत असल्याने, तो इंग्लंड अ संघाकडून खेळण्यास पात्र नाही. एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) स्पष्टीकरण आल्यावर, सायमंड्सची पाकिस्तान दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. मात्र, त्याचे हृदय ऑस्ट्रेलियात असल्याने त्याने माघार घेतली. “माझे भविष्य इंग्लंडमध्ये आहे, हे मी ठरवले तर याचा अर्थ माझे कुटुंब, माझी मैत्रीण आणि ऑस्ट्रेलियातील माझ्या सर्व मित्रांना सोडून जाणे होईल,” असे सायमंड्सने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले होते.
५. रग्बी लीगबद्दल महत्वाकांक्षा
सायमंड्स पहिल्यांदा १९९८मध्ये २३व्या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी खेळला होता, परंतु त्याला संघात स्वतःचे वलय निर्माण करण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागली. अनेकदा, शंका मनात डोकावू शकतात असेच काहीसे त्याच्यासोबत झाले. सायमंड्सने २००२मध्ये रग्बी लीगमध्ये जाण्याचा विचार केला. २००९मध्ये, वादग्रस्त कराराच्या उल्लंघनानंतर त्याला ऑस्ट्रेलियन सेटअपमधून काढून टाकण्यात आले. ऑस्ट्रेलियाला परतल्यावर, तो ब्रिस्बेन ब्रॉन्कोस संघाच्या प्रशिक्षण सत्रात सहभागी होऊ लागला. जून २००९मध्ये त्याने प्रदर्शनी खेळामध्ये विनम-मॅनली संघासाठी एक सामना देखील खेळला. तथापि, त्यानंतर तो क्रिकेटमध्ये परतला आणि २०११पर्यंत खेळला. २००८मध्ये ब्रिस्बेन येथे झालेल्या सामन्यादरम्यान त्याने अस्ट्रेकरला खांदा दिला, तेव्हा त्याचा रग्बीचा अनुभव उपयोगी पडला.
६. बास्केटबॉल स्टारच्या नावावर रॉय टोपणनाव
तरुण वयात, सायमंड्सला रॉय हे टोपणनाव देण्यात आले होते. हे नाव त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या दिवसांमध्ये चर्चेत होते. कारण, लेरॉय लॉगगिन्स हा ब्रिस्बेनचा बास्केटबॉल खेळाडू होता आणि काहींना असे वाटायचे की, सायमंड्स त्याच्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याला रॉय हे टोपणनाव देण्यात आले होते.
७. मॅथ्यू हेडनसोबत शार्कच्या पाण्यात पोहणे
सायमंड्सला मासेमारी आवडायची, पण एका प्रसंगी त्याने स्वत:ला मॅथ्यू हेडनसह अक्षरशः धोकादायक पाण्यात टाकले होते. स्टीफन ग्रे, ज्याने स्वतः सायमंड्ससोबत त्याचे आत्मचरित्र लिहिले, त्यांनी डीएनएला सांगितले होते की, मॅथ्यू, एँड्र्यू आणि दुसरा मित्र पोहायला गेले होते. असे असताना अचानक तिघांना खोल पाण्यात सोडून बोट बुडाली. एका बेटावर पोहोचण्यासाठी त्यांना तीन तासांपेक्षा जास्त वेळ पोहावं लागलं. पाण्यात शार्क आहेत हे त्यांना माहीत होतं, पण त्यांनी ते धाडस केलं.
८. स्टीव्ह वॉची जागा घेणे आणि शेन वॉर्नच्या ५००व्या कसोटी विकेटमध्ये भूमिका बजावणे
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सायमंड्स हा प्रामुख्याने मर्यादित षटकांचा खेळाडू मानला जायचा. मात्र, जेव्हा स्टीव्ह वॉ २००४मध्ये निवृत्त झाला, तेव्हा सायमंड्सला संघात आणण्यात आले आणि त्याने श्रीलंकेत कसोटी पदार्पण केले. या मालिकेत रिकी पाँटिंगची कसोटी कर्णधार म्हणून सुरुवात झाली आणि शेन वॉर्नचे ड्रग-संबंधित बंदीनंतर पुनरागमन झाले. जरी सायमंड्स या मालिकेत फारसा यशस्वी ठरला नसला, तरी वॉर्नने त्याची ५००वी विकेट घेण्यात त्याने आपली मोलाची भूमिका बजावली. सायमंड्स हा क्षेत्ररक्षक होता, ज्याने हशनतिलकरत्नेला बाद करण्यासाठी झेल घेतला, ज्याने वॉर्नला महत्त्वाचा विक्रम रचण्यात वाटा उचलला.
९. मद्यपान समस्या आणि वादग्रस्त करार कलम
सन २००५मध्ये, कार्डिफमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिरंगी मालिकेपूर्वी सायमंड्सला ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले होते. कारण, आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने दारूचे सेवन केले होते. त्याने संघाच्या नियमांचे उल्लंघन केले आणि परिणामी, त्याला दोन सामन्यांसाठी वगळत दंडही ठोठावण्यात आला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. मंकीगेटच्या घटनेनंतर सायमंड्सची कारकीर्द उलगडली. २००८मध्ये, तो मध्येच संघाची बैठक सोडून मासेमारीसाठी गेला. त्यामुळे त्याची काही महिन्यांसाठी संघातून हाकालपट्टी झाली. इतकंच नाही, तर तो परत आल्यावर त्याच्यावर एका बारमध्ये भांडण झाल्याचा आरोप होता.
मद्यपान केल्यानंतर २००९च्या सुरुवातीला त्याने एक वादग्रस्त रेडिओ मुलाखतही दिली होती. त्या मुलाखतीदरम्यान, त्याने ब्रेंडन मॅक्युलमला अपशब्दाचा वापर करत संबोधले होते. सायमंड्स वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियन संघात परतला आणि आयसीसी टी२० विश्वचषकासाठी संघात होता. त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत (CA) करार करावा लागला, ज्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू शकत नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याला ड्रेसिंग रूममध्ये मद्यपान करण्याची परवानगी होती, परंतु सार्वजनिक ठिकाणी नाही. स्पर्धेच्या अगोदर, त्याने आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सार्वजनिक ठिकाणी रग्बीचा खेळ पाहत असताना मद्यपान केले होते, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीचा शेवट झाला. सायमंड्सने वेळोवेळी सांगितले होते की, त्याने हे स्वीकारलेले की, तो एक मद्यपान करणारा व्यक्ती होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
१०. चॅरिटीसाठी बलिदान
सायमंड्सकडे ट्रेडमार्क ड्रेडलॉक्स होते, ज्यामुळे तो बॅटिंगला बाहेर पडला, तेव्हा त्याला एक भयानक लूक दिला गेला होता. तथापि, त्याने त्याच्या कारकिर्दीत नंतर केस कापले होते. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, त्याने ल्युकेमियाग्रस्त मुलांसाठी आणि फ्लाइंग डॉक्टरांसाठी चॅरिटीसाठी केस कापल्याचे उघड केले. सायमंड्स म्हणाला होता की, त्याने ड्रेडलॉक्स (दोरीप्रमाणे केस) चॅरिटीसाठी कापले होते.
११. आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा परदेशी खेळाडू
सन २००८च्या सुरुवातीला, मंकीगेट घोटाळ्यानंतर क्रिकेट जगत अजूनही तापले होते. सायमंड्स हा भारतीय चाहता बनला होता. त्यामुळे डेक्कन चार्जर्सने त्याची किंमत ओळखली आणि त्याला १.३५ मिलियन डॉलर्स म्हणजेच २०२०च्या हिशोबाने जवळपास ९.९५ कोटी रुपयांमध्ये संघात घेतले होते. ज्यामुळे तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) २००८च्या लिलावात सर्वाधिक पैसे देणारा परदेशी खेळाडू बनला होता. त्या लिलावात फक्त भारतीय कर्णधार एमएस धोनीला जास्त किंमत मिळाली होती. धोनीला २०२०च्या हिशोबाने ११ कोटी रुपये मिळाले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ऑस्ट्रेलियाच्या महान अष्टपैलू क्रिकेटरचा कार अपघातात मृत्यू, क्रिकेटविश्वावर शोककळा
टीम इंडियाबरोबर झालेल्या ‘त्या’ वादामुळे दारुडा झाल्याचे सायमंडने केले होते आरोप
दारु पिणे किती महागात पडू शकते, याची ५ क्रिकेटमधील उदाहरणे