मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३१ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने १८ धावांनी विजय मिळवला. पण असे असले तरी, बेंगलोरच्या विजयाबरोबरच माजी कर्णधार विराट कोहलीचीही या सामन्यादरम्यान बरीच चर्चा झाली.
विराटची बॅट थंड
आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट फारशी तळपलेली दिसत नाही. ३१ व्या सामन्यात तर तो लखनऊचा गोलंदाज दुश्मंता चमिराच्या गोलंदाजीवर पहिला चेंडू खेळताना बाद झाला. आयपीएलमध्ये गोल्डन डकवर म्हणजेच पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होण्याची विराटची ही चौथीच वेळ होती. तसेच २०१७ नंतरची पहिलीच वेळ होती. तसेच यंदा विराटने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९.८३ च्या सरासरीने ७ सामन्यांत केवळ ११९ धावा केल्या आहेत.
विराटला शतकाचीही प्रतिक्षा
खरंतर विराटच्या कामगिरीबाबत सध्या सातत्याने चर्चा होत आहे. कारण गेल्या दोन-अडीच वर्षांपासून विराटच्या बॅटमधून मोठी खेळी आलेली नाही. जवळपास गेल्या १०० सामन्यांपासून त्याला शतक करता आलेले नाहीये. विराटने त्याचे अखेरचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यांत केले होते. त्यानंतर विराटसाठी लखनऊविरुद्धचा १०० वा सामना होता, ज्यात त्याला शतक करता आलेले नाही (Wait for Century).
त्याने शेवटच्या शतकानंतर १७ कसोटी, २१ वनडे आणि २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तसेच ३७ आयपीएल सामने खेळले आहेत. पण त्याला एकदाही तीन आकडी धावसंख्या गाठता आलेली नाही. त्याने यादरम्यान अनेकदा अर्धशतके केली. पण त्याला अर्धशतकाचे रुपांतर शतकात करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता सर्वच चाहते त्याच्या बॅटमधून शतक लवकर येण्याची तसेच तो फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा करत आहेत.
बेंगलोरची शानदार कामगिरी
विराटने आयपीएल २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर बेंगलोरने आयपीएल २०२२ साठी फाफ डू प्लेसिसला (Faf du Plessis) लिलावातून खरेदी करत त्याच्याकडे नेतृत्व सोपवले. त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये फाफ डू प्लेसिस बेंगलोरचे नेतृत्व करताना दिसत असून त्याच्या नेतृत्वाखाली बेंगलोरने आत्तापर्यंत ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत, तर २ सामने पराभूत झाले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| दिल्ली वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
‘माझ्याशी लग्न करशील का?’ महिला चाहतीचा श्रेयस अय्यरला थेट प्रश्न, Photo भन्नाट व्हायरल
IPL 2022| लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुलला मोठा दंड, तर स्टॉयनिसलाही फटकारलं, वाचा नक्की काय झालं






