---Advertisement---

बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात झाली ‘या’ विक्रमांची नोंद

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 3:45 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये काल (28 सप्टेंबर) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत तीन बाद 201 धावा केल्या, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई संघाला 5 बाद 201 धावाच करता आल्या.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सचा संघ 7 धावाच करू शकला आणि आरसीबीने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले. दोन्ही संघांमधील या सामन्यादरम्यान अनेक जबरदस्त विक्रमही झाले. चला या विक्रमांवर नजर टाकूया…

• आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात दुसर्‍यांदा सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. 2013 च्या आयपीएलच्या हंगामात त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा (आता दिल्ली कॅपिटल्स) सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता.

• मुंबई इंडिअन्सचा युवा प्रतिभावान खेळाडू इशान किशन आयपीएलमध्ये 99 धावांवर बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याआधी विराट कोहली आणि पृथ्वी शॉ 99 धावांवर बाद झाले होते.

• जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हरमध्ये आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा गोलंदाजी केली आणि पहिल्यांदा मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला.

• मुंबईने सुपर ओव्हरमध्ये 7 धावा केल्या आणि आयपीएलच्या इतिहासातील सुपर ओव्हरमधील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी, किंग्स इलेव्हन पंजाब संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध फक्त 2 धावा केल्या होत्या.

• आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यातील 2 सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---