fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जबरदस्त क्रिकेट खेळलेले व इंजिनीअरिंगच शिक्षण घेतलेले ११ क्रिकेटर्स

असं म्हणतात की इंजीनिअरने प्रोफेशन बदललं की काहीतरी मोठं होणार असतं. अशाच काहीतरी वेगळा मार्ग निवडलेल्या (अर्थात तो मार्ग क्रिकेटचा आहे. ) काही इंजीनिअर अवलियांबद्दल…

इंजीनिअरींगची पदवी घेतलेल्या अनेक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाकडून कारकिर्द घडवली आहे. ही कारकिर्द अवघड असण्याचं कारण म्हणजे इंजीनिअरींगच्या पदवीला लागणारा ४ वर्षांचा वेळ.

जगातील अनेक चांगल्या क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द वयाच्या १७-१८ला सुरु झालेली असताना इंजीनिअरला २०-२१ वयापर्यंत शिक्षण घ्यावे लागते. अर्थात अनेकांनी तेव्हा प्रथम श्रेणी क्रिकेटचाही श्रीगणेशा केलेला नसतो. त्यात ८ सेमीस्टरमध्ये जवळपास ४०हुन अधिक विषय आणि २४-२५ प्रात्यक्षिकांचे विषय करुन जर कुणी क्रिकेटमध्ये उत्तम कारकिर्द करत असेल तर त्याला सलामच करावा.

तुम्हाला काॅलेज आणि क्रिकेटची सांगड घालून सराव, देशांतर्गत सामने, क्लब क्रिकेट सगळंच मॅनेज कराव लागतं. शिवाय चांगली नोकरी लागण्याची शक्यता असताना तुम्ही क्रिकेटमधील सुरुवातीचा काही काळ स्ट्रगलसाठी तयार असता. त्यामुळे इंजीनिअर हे एक वेगळंच रसायन क्रिकेटच्या क्षेत्रात पहायला मिळतं.

भारताकडून अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, आर अश्विन, के श्रीकांत, श्रीनिवास वेंकटराघवन आणि इरापल्ली प्रसन्नासारख्या दिग्गजांची इंजीनिअरींगची पदवी तर घेतलीच शिवाय क्रिकेटमध्ये उत्तम कारकिर्दही घडवली. यातील के श्रीकांत सोडले तर बाकी सर्वजण गोलंदाज. असं म्हणतात की गोलंदाजीची कारकिर्द फलंदाजाच्या तुलनेत लवकर सुरु होते आणि लवकर संपते. असं असताना यातील अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ किंवा अश्विनने मात्र शिक्षणाबरोबर क्रिकेट कारकिर्दीत केलेला कारनामा अफलातून आहे.

आश्विनची प्रथम श्रेणी कारकिर्द २०व्या तर आंतरराष्ट्रीय कारकिर्द २४व्या वर्षी सुरु झाली. जवागल श्रीनाथची प्रथम श्रेणी कारकिर्दही २०व्या तर आंतरराष्ट्रीय कारकिर्द २३व्या वर्षी सुरु झाली. कुंबळेचे आंतरराष्ट्रीय पदार्पण मात्र २०वयाच्या आतच झाले. ही सर्व वयाची आकडेवारी पाहिली तर या खेळाडूंनी आपलं शिक्षण पुर्ण करताना काय काय केलं असेल याचा विचारच न केलेला बरा.

एक इंजीनिअर काय काय करु शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे श्रीनिवास वेंकटराघवन. पहिल्या दोन विश्वचषकात त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्त्व तर केलंच शिवाय पुढे संघ व्यवस्थापक, आंतरराष्ट्रीय पंच, सामनाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. हे करताना त्यांनी इंजीनिअरिंगमध्ये ज्या कशाचा अभ्यास केला असेल त्याचा नक्कीच उपयोग त्यांना कारकिर्दीत एका क्षेत्रातून दुसरीकडे स्विच होताना झाला असणार.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम इंजीनिअर म्हणून अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने बेंगलोरच्या इलेक्ट्राॅनिक्स सिटीमध्ये इंजीनिअर म्हणून नोकरीला प्राधान्य न देता भारताकडून ४०३ सामने खेळताना ९५६ विकेट्स घेत हा कारनामा केला आहे.

असा होऊ शकतो इंजिनियर्सचा ११ जणांचा संघ –

सईद अन्वर (कंम्युटर), के श्रीकांत (इलेक्ट्रिकल), सुजीत सोमासुंदर (कंम्युटर), राशिद लतिफ (कंम्युटर), सर्फराज अहमद(इलेक्ट्राॅनिक्स, यष्टीरक्षक), आर अश्विन (आयटी), अनिल कुंबळे (मेकॅनिकल, कर्णधार), इरापल्ली प्रसन्ना, जवागल श्रीनाथ(इंस्ट्रुमेटशन) , रजनीश गुरबानी (सिव्हील) आणि आर वेंकटराघवन

ट्रेंडिंग घडामोडी – 

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

वनडेत क्रिकेटमध्ये एका षटकात १७ चेंडू टाकणारा गोलंदाज

३ कधीही विचार न केलेले विक्रम आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर

You might also like